Maharashtra HSC Result 2021: MSBSHSE बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, पाहा किती वाजता पाहता येणार निकाल
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन व मूल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इयत्ता 12वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन व मूल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे.
अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इयत्ता 12वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत वेबसाइटवर मंगळवार 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय देण्यात आलेले गुण खालील वेबसाइटवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट घेता येईल.









