चिकन न बनवल्याने भडकला, पत्नीचं डोकं फोडतं हातही तोडला
Husband beaten Wife :पती पत्नीमध्ये शुल्लक कारणावरून दररोज भांडणे होत असतात. मात्र काही भांडणे इतकी टोकाला पोहोचतात की पोलीस (Police)ठाण्यापर्यंत प्रकरण पोहोचतं. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीने (Husband) पत्नीला चिकन बनवण्यास सांगितले होते. मात्र पत्नीने (Wife) नकार दिल्याने पतीने तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेत पत्नी इतकी गंभीर जखमी झाली […]
ADVERTISEMENT

Husband beaten Wife :पती पत्नीमध्ये शुल्लक कारणावरून दररोज भांडणे होत असतात. मात्र काही भांडणे इतकी टोकाला पोहोचतात की पोलीस (Police)ठाण्यापर्यंत प्रकरण पोहोचतं. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीने (Husband) पत्नीला चिकन बनवण्यास सांगितले होते. मात्र पत्नीने (Wife) नकार दिल्याने पतीने तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेत पत्नी इतकी गंभीर जखमी झाली आहे की तिला रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.तसेच शेजाऱ्यांनी पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत. (husband beaten his wife for not cooking chicken in holi festival chandrapur incident)
राज्यात नुकतीच होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी अनेकांच्या घरी पंचपकवान बनले होते. या घटनेतील कुटूंबियांच्या घरी देखील पंचपकवानचाच बेत होता. त्यामुळे पतीने सणासुदीनिमित्त घरी चिकन आणले होते. त्याने हे चिकन घरी येऊन पत्नीकडे सुपूर्द करून तिला बनवण्यास सांगितले होते. पण त्याआधीच पत्नीचे जेवण बनवून झाले होते. त्यामुळे तिने जेवण बनवून झाले आहे, आता चिकन बनवता येणार नाही, संध्याकाळी बनवून देईन, असे उत्तर दिले होते. पत्नीचे हे उत्तर एकूण पती संपातला आणि तिला बेदम मारझोड करू लागला.
Video: पुण्यात सोनसाखळी चोरणाऱ्या चोराशी 10 वर्षांची मुलगी एकटीच भिडली
पत्नीचा नकार,पतीचा संताप
पत्नीने चिकन बनवून देण्यास नकार देताच पती (Husband) वैतागला आणि त्याने घराबाहेरून दांडू आणत पत्नीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. पतीने तिच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार प्रहार केला. पतीने इतकी मारहाण केली की, पत्नी रक्तबंबाळ झाली होती. शेजाऱ्यांनी ही घटना पाहताच त्यांनी ही मारहाण रोखत, पत्नीला रूग्णालयात दाखल केले तर पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले.