मी भाजपला हरवलं… विजयानंतर बाबूश मोन्सेरात यांची अत्यंत धक्कादायक प्रतिक्रिया, गोव्यात काय घडणार?
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष हे पणजी या मतदारसंघाकडे लागून राहिलं होतं कारण या मतदारसंघात भाजपचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा पुत्र उत्पल पर्रिकर याने भाजपविरोधात बंड करुन अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात भूमिका घेऊन उत्पल यांनी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. यावेळी भाजपकडून बाबूश यांची खंबीरपणे […]
ADVERTISEMENT

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष हे पणजी या मतदारसंघाकडे लागून राहिलं होतं कारण या मतदारसंघात भाजपचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा पुत्र उत्पल पर्रिकर याने भाजपविरोधात बंड करुन अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात भूमिका घेऊन उत्पल यांनी भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. यावेळी भाजपकडून बाबूश यांची खंबीरपणे पाठराखण करण्यात आली होती. पण असं असताना निवडून आल्यानंतर बाबूश मोन्सेरात यांनी ‘मुंबई Tak’सोबत बोलताना अतिशय मोठी आणि धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.
‘माझा विजय हा माझ्या कार्यकर्त्यांमुळे झाला आहे. खरं तर मी भाजप आणि काँग्रेस असा दोघांचा पराभव केला आहे.’ असं बाबूश मोन्सेरात यांनी म्हटलं आहे. बाबूश यांची ही प्रतिक्रिया भाजपसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
पाहा बाबूश मोन्सेरात नेमकं काय म्हणाले:
‘मी या निकालाने खूप नाराज आहे. पणजी आणि ताळगाव येथील भाजप पक्ष.. विशेषत: कार्यकर्त्यांनी आम्हाला अजिबात पाठिंबा दिला नाही. ताळगावमध्ये तर भाजपची महिला अध्यक्ष ही स्वत: मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या बुथवर बसली होती. असंच पणजीमध्ये देखील घडलं.’










