नम्रपणाने सांगतो मी कुशल नेतृत्व वगैरे नाही, फक्त निमित्तमात्र आहे: उद्धव ठाकरे
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (23 मे) बाल रोगविषयक टास्क फोर्सशी (Task Force) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा (Corona) धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले की, ‘कुशल नेतृत्व वगैरे काही नाही. मी […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (23 मे) बाल रोगविषयक टास्क फोर्सशी (Task Force) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा (Corona) धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे बोलताना असं म्हणाले की, ‘कुशल नेतृत्व वगैरे काही नाही. मी निमित्त मात्र आहे. मी काही करत नाहीए. अनेकदा माझ्यावर टीका होते की, मी घरी बसलेलो आहे. पण आता जो काही कोरोना नियंत्रणात आहे त्याचं श्रेय डॉक्टरांना देतो.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एक प्रकारे टोला हाणला आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले:
‘आपण सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहोत. आता अंदाज व्यक्त केला जात आहे की, तिसरी लाट येऊ शकते आणि वयाचा विचार केल्यास आपल्याला समजेल की, पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त लागण झाली, दुसऱ्या लाट जिचा आता आपण सामना करत आहोत त्यामध्ये युवा आणि मध्यमवयीन लोकांना लागण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाही.’
हे वाचलं का?
‘पुढे बोलण्याआधी मी एक नम्रपणाने सांगू इच्छितो की, डॉक्टर विजय आपण माझा उल्लेख केला की, कुशल नेतृत्व वगैरे काही नाही. मी निमित्त मात्र आहे. मी काही करत नाहीए. अनेकदा माझ्यावर टीका होते की, मी घरी बसलेलो आहे. पण आता या जे काही कोरोनावरचं नियंत्रण दिसतं आहे त्याचं श्रेय हे मी नम्रपणाने माझ्यासोबत मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टरांना देतो आहे.’
‘लॉकडाऊन हा निर्णय अत्यंत कठोर आणि कटू असतो. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना राज्याच्या हिताच्या दृष्टीने कटूपणा घेण्याची माझी तयारी असल्याचं मी आधीही सांगितलं होतं. दुर्दैवाने मला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आणि नागरिकांनी त्याला संपूर्ण सहकार्य केलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की, मी निमित्तमात्र आहे. एकटा कॅप्टन हा काहीही करु शकत नाही. त्याची टीम महत्त्वाची असते. मला सार्थ अभिमान आहे की, माझी टीम ही मजबूत आणि कुशल आहे.’
ADVERTISEMENT
‘मी पुन्हा एकदा सांगतो की, अजिबात घाबरु नका. घाबरण्याचं कारण नाही. समजा कोरोनाची तिसरी लाट आलीच. येऊ नये ही मनापासून प्रार्थना आहे. पण समजा जर तिसरी लाट आली आणि लहान मुलांना त्याचा संसर्ग होऊ लागला तर काय करावं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच काय करु नये हे देखील महत्त्वाचं आहे. अनाठायी, अनावश्यक औषधं देऊ नये.’
ADVERTISEMENT
त्यांना माझा नमस्कार आहे ! उद्धव ठाकरे राजना असं का म्हणाले??
‘खासकरुन आपल्या मुलांना काही होऊ नये यासाठी जे पालक आपला हा कार्यक्रम पाहत असतील त्यांना आपण आश्वस्थ केलं पाहिजे की, घाबरु नका आम्ही आहोत. काही चिंता करु नका. फक्त वेळेत मुलांना डॉक्टरकडे घेऊन जा.’
‘आता यानिमित्ताने काही प्रश्न निर्माण होत आहेत ते म्हणजे लहान मुलांना मास्किंग कसं करायचं, वावरायचं कसं याबाबत देखील आपण तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करा. मी अजूनही तेच म्हणतोय की, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी आपली तयारी देखील सुरु आहे.’
आता कुठे गेले अंधभक्त? उद्धव ठाकरेंचं कौतुक करत सुब्रमण्यम स्वामींचा केंद्राला टोला
‘दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे लसीकरणाचा. याबाबतीत मी आधी देखील सांगितलं आहे की, 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जी जबाबदारी आपल्यावर राज्य सरकारवर सोपवण्यात आली आहे त्याबाबत मी पुन्हा सांगतं आपलं महाराष्ट्र सरकार, महाविकासआघाडीचं सरकार हे 6 कोटी नागरिकांना दोन डोस द्यायचे झाले तर 12 कोटी डोस एकरकमी, एका चेकने घेण्याची आपली तयारी आहे.’
‘दुर्दैवाने आपल्याला लसीची पुरवठा हा होत नाही. म्हणून नाईलाजास्तव आपल्याला 18 ते 44 वयोगटातील लोकांचं नागरिकांची लसीकरणाची मोहीम स्थगित करावी लागली आहे. दरम्यान, लस बनविणाऱ्या कंपन्यांसोबत आपल्या सरकारची बोलणी सुरु आहेत. त्यावरुन असं समजतं आहे की, जून महिन्यापासून या कंपन्यांची उत्पादन क्षमता वाढत जाईल आणि जसजशी त्यांचे उत्पादन वाढेल तसतसं आपण आपला लसीकरणाची मोहीम पुढे नेणार आहोत.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक बाबींवर भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT