आपण देशातल्या Largest Bull Run वर आहोत- राकेश झुनझुनवाला
आठवड्याच्या अखेरीस शेअर मार्केटमध्ये उत्साह बघायला मिळाला. सेन्सेक्सने जोरदार उसळी घेत पहिल्यांदाच 60 हजारांच्या पुढे झेप घेतली. शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांकाने 273 अंकांची उसळी घेत 60,000 चा टप्पा पार केला. याबाबत बिझनेस टुडेला गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मुलाखत दिली आहे. 60 हजार हा जस्ट एक नंबर आहे सेन्सेक्सची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे […]
ADVERTISEMENT

आठवड्याच्या अखेरीस शेअर मार्केटमध्ये उत्साह बघायला मिळाला. सेन्सेक्सने जोरदार उसळी घेत पहिल्यांदाच 60 हजारांच्या पुढे झेप घेतली. शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांकाने 273 अंकांची उसळी घेत 60,000 चा टप्पा पार केला. याबाबत बिझनेस टुडेला गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मुलाखत दिली आहे.
60 हजार हा जस्ट एक नंबर आहे सेन्सेक्सची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे असं मत राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केलं आहे. एवढंच नाही तर आज जे शेअर बाजारात झालं ती सगळ्यात मोठ्या रनची सुरूवात आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. सध्याच्या घडीला टाटा मोटर्सने आघाडी घेतली आहे. ते भारतातील इलेक्ट्रिकल्ट व्हेइकल मार्केटचे नेतृत्व करतील अशी आशा मला आहे असंही राकेश झुनझुनवालांनी म्हटलं आहे. मी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. येत्या काळात ती वाढवणारही आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या बाबतीत मी खूपच सकारात्मक आहे आणि मला वेगाने प्रगती करायची आहे. मी योगा करतो. माझ्या व्यक्तिगत सवयी इंप्रुव्ह करतो आहे. माझं आरोग्य सुधारावं यासाठीही मी मेहनत घेतो आहे. देशाची प्रगती झाली पाहिजे आर्थिक बाबतीत आणखी विकास झाला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं असंही झुनझुनवालांनी सांगितलं.
आठ महिन्यात ओलांडला १०,००० अंकांचा टप्पा
जगभरातील शेअर बाजारात तेजीचं वातावरण असून, भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा टप्पा गाठला आहे. शुक्रवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ६० हजारांचा टप्पा पार केला. अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत शेअर बाजाराने १० हजार अंकांची झेप घेतली आहे.
जानेवारीमध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक ५० हजारांवर होता. फेब्रुवारीमध्ये ५१ हजारांवर पोहोचला. त्यानंतर एकदम मुसंडी मारत फक्त दहा दिवसात (१५ फेब्रुवारी) शेअर बाजाराने १ हजार अंकांचा टप्पा ओलांडत ५२ हजारांवर झेप घेतली होती.
फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान निर्देशांकाची वाढ मंदावली होती. जूननंतर पुन्हा हळूहळू तेजी दिसू लागली आणि ऑगस्टमध्ये निर्देशांक ५५ हजारांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये निर्देशांकात तीन हजार अंकांची वाढ झाली. ऑगस्ट अखेरीस निर्देशांक ५७ हजारांवर पोहोचला होता.