Pankaja Munde यांना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच-गुलाबराव पाटील

मुंबई तक

पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच होतो असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होते आहे अशी चर्चा आहे. अशात गुलाबराव पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारं ठरलं आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना हे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच होतो असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होते आहे अशी चर्चा आहे. अशात गुलाबराव पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारं ठरलं आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना हे वक्तव्य केलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांचं काम आभाळाएवढं होतं. त्यांनी पक्ष खूप मोठा केला, त्यांच्या वारस असलेल्या पंकजा मुंडे यांना आज पक्षात मान नाही. त्यांना संघर्ष करावा लागतो आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच होईल आणि योग्य सन्मानही मिळेल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे भाजप सोडून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तेव्हाच मी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याबाबत विचारलं होतं पहिली ऑफर देणारा मीच होतो असं गुलाबराव पाटील यांनी आता म्हटलं आहे. पंकजाताईंना विचारणारा पहिला गुलाबरावच होता.

पंकजाताईंना पक्षात त्यांना डावललं जातं आहे. आदरणीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी आयुष्य वेचलं. मात्र त्यांच्या मुलीला पदासाठी संघर्ष करावा लागतो आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकिट निवडणुकीच्या वेळी कापलं, एकनाथ खडसे यांचं तिकिट कापलं. मुंडेताईंचा पराभव झाला. भाजपकडून ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करणं सुरू आहे. इथल्या समाजाने हे पाहिलं त्यांना हे माहित आहे आमचा एकमेव नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे होते. त्यांच्या वारस असलेल्या पंकजा मुंडे यांनी आता अन्याय न सहन करता शिवसेनेत जावं अशी मागणी आता त्यांचेच कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला वाटतं की शिवसेना पंकजा मुंडे यांना सन्मान देऊ शकतं. त्या जर शिवसेनेत आल्या तर पंकजा मुंडे यांचा सन्मानच होईल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Pankaja Munde समर्थकांची नाराजी कायम? परळीत वाढदिवसानिमीत्त लागलेल्या बॅनरवर भाजप नेत्यांना स्थान नाही

हे वाचलं का?