Devendra Fadnavis: “संजय राऊत यांनी स्वतःच्या तुरुंगवासाची तुलना वीर सावरकर यांच्यासोबत करणं..”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १०२ दिवसांनी म्हणजेच ९ नोव्हेंबरला जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर १०३ दिवसांनी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांनाही तुरुंगात जावं लागलं होतं असं म्हणत स्वतःच्या तुरुंगवासाची तुलना त्यांच्यासोबत केली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते शिवसेना खासदार संजय राऊत?

माझी प्रकृती आजही बरी नाही. मी तुरुंगात होतो तेव्हा एकांतात होतो. वीर सावरकर तुरुंगात इतकी वर्षे कसे राहिले? लोकमान्य टिळक कसे राहिले? याचा विचार मी करत होतो. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कुणालाही खोट्या आरोपात तुरुंगात पाठवलं गेलं तर ते चूकच आहे. हायकोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते आपण पाहिलं. या देशाच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे. असं वक्तव्य संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केलं होतं. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक भाष्य केलं आहे.

काय म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी?

देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा नाशिकमध्ये संजय राऊत जे म्हटले की वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनीही तुरुंगवास भोगला. तसाच मी पण भोगला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की या सगळ्या प्रतिक्रियेवर मी फक्त स्मितहास्य करेन.

हे वाचलं का?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. मातोश्रीवर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे काम करत आहेत असं म्हटलं होतं. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंना उद्देशून काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरेंना आरोप करायची सवय आहे, मला असे वाटते की त्यांनी अंतर्मनात शिरून पाहिले तर त्यांना याचे उत्तर मिळेल

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT