Chandrakant Patil: “आई-वडिलांना शिव्या द्या, मोदी-शाह यांना दिलेल्या शिव्या सहन करू शकत नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरूवारी पुण्यात सत्कार झाला. पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुणे भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत एक वक्तव्य केलं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. मोदी आणि शाह यांना कुणी शिव्या दिल्या तर ते सहन करू शकत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय वक्तव्य केलं आहे चंद्रकांत पाटील यांनी?

“एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या. कोल्हापूरमध्ये तर आईवरून शिव्या द्यायची पद्धत आहेच. मात्र पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांनी केलेलं हे वक्तव्य ट्विटर आणि सोशल मीडियावर चांगलंच चर्चे आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मानले आयोजकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार

चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमात आय़ोजकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच मानले. कोथरूड या मतदारसंघातून मला जेव्हा पक्षाने उमेदवारी दिली. त्यावर बराच वाद झाला होता. मात्र पक्षाने काहीतरी विचार करूनच मला उमेदवारी दिली होती शाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये कामं केली आहेत. हातकंणगले मतदारसंघातील निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचाही उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी भाषणात केला.

हे वाचलं का?

महाविकास आघाडी सरकार कसं पडलं?

मी दोन-अडीच वर्षांपासून सांगत होतो की आपलं सरकार येईल, मी हे सांगायला काही वेडा नव्हतो. काही ना काही संदर्भ माझ्या मनात होते. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना फोडणं सोपं नव्हतं. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणं महत्त्वाचं असतं. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती वेळ साधली. त्यानंतर आपलं सरकार आलं. असा खुलासा भाजप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंचं चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासाठी धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. २१ जूनला महाराष्ट्रात बंड झालं. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारलं. त्यानंतर शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट असे दोन गट पडले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT