Uddhav Thackeray :”उद्या दाऊद भाजपमध्ये आला तर त्यालाही मंत्री करतील” मुख्यमंत्र्याचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या बीकेसीमधल्या भाषणात भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या टार्गेटवर भाजप असणार हे स्पष्ट होतं. त्यानुसारच त्यांचं हे भाषण होतं. कुणाच्याही अंगावर आम्ही जात नाही मात्र कुणी आला तर त्याला सोडत नाही हे आमचं हिंदुत्व आहे असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. एवढंच नाही तर उद्या दाऊद जरी भाजपमध्ये आला तर […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या बीकेसीमधल्या भाषणात भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या टार्गेटवर भाजप असणार हे स्पष्ट होतं. त्यानुसारच त्यांचं हे भाषण होतं. कुणाच्याही अंगावर आम्ही जात नाही मात्र कुणी आला तर त्याला सोडत नाही हे आमचं हिंदुत्व आहे असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. एवढंच नाही तर उद्या दाऊद जरी भाजपमध्ये आला तर त्यालाही मंत्री करतील असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
हे वाचलं का?
“महाराष्ट्राला बदनाम करणं सुरू आहे. आम्ही संयम बाळगतो आहोत म्हणजे बोलू शकत नाही असं नाही. सत्ता मिळत नाही म्हणून जे काही चाललं आहे ते दुर्दैवी आहे. भाजप कोणत्या दिशेने चाललं आहे तेच कळत नाही. महाराष्ट्र विद्रुप करण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे. हिंदुत्वाची चिंता करण्याची गरजच नाही तुम्हाला त्यासाठी आमचे मावळे इथे बसले आहेत.”
“मुंबईत माफियाराज सुरू आहे असं चित्र उभं केलं जातं आहे. आता दाऊदच्या मागे लागले आहेत. पण दाऊद म्हणाला की भाजपमध्ये येतो तर मंत्री म्हणून तो त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणूनच त्याच्या मागे लागले असतील. आमच्यामध्ये ये तुला मंत्री करतो आणि सांगतील दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुतळा आहे. ही अशी चित्रविचित्र भानगडी करणारी माणसं पाहिल्यानंतर हे स्वतःला हनुमान पुत्र म्हणवू तरी कसे शकतात? असा प्रश्न मला पडतो.”
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray : “गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ…” भाजपला जोरदार टोला
ADVERTISEMENT
“हनुमानाने पेटत्या शेपटीने अख्खी लंका जाळली होती. मात्र हे अयोध्या पाडल्यावर शेपट्या घालून बसले होते. त्यावेळी तुमची वितभर नाही कित्येक मैल पळापळ झाली होती. पटकन बोललेलं बरं तुमचा गैरसमज व्हायचा. त्यामुळे हनुमानाचं नाव तुमच्या तोंडी शोभत नाही. कोरोना काळात रिकाम्या थाळ्या गो कोरोना गो म्हणून बडवल्या. त्या अजूनही रिकाम्या आहेत. मात्र जी शिवभोजन थाळी आपण देत होतो त्याचं वितरण रोज सुरू आहे. आम्ही भरलेली थाळी देतो रिकामी थाळी नाही देत. रिकाम्या थाळीचं काय करायचं? तर गॅलरीत जा आणि बडवा गो महागाई गो… गो बेकारी गो…” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT