Supriya Sule : “मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा”
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष मागच्या आठ दिवसांपासून सुरू आहे. पक्षाचे क्रमांक २ चे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. त्यांच्या साथीला शिवसेनेचे ३९ आमदार आहेत. तर इतर १२ अपक्षही आहेत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार या भूमिकेमुळे कधीही कोसळू शकतं अशी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष मागच्या आठ दिवसांपासून सुरू आहे. पक्षाचे क्रमांक २ चे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. त्यांच्या साथीला शिवसेनेचे ३९ आमदार आहेत. तर इतर १२ अपक्षही आहेत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार या भूमिकेमुळे कधीही कोसळू शकतं अशी स्थिती आहे. अशात सुप्रिया सुळे यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
”मला उद्धव ठाकरे यांचा अभिमान वाटतो. बाळासाहेब नसतानाही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना भाविनक आवाहन केलं आहे. मी भविष्य वर्तवू शकत नाही पण कुटुंबातून कुणी सोडून जात असेल तर त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ते उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिमान वाटतो.” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे गटावरही भाष्य