जुहू बीचवर फिरायला जायचं असेल तर कोव्हिड टेस्ट करावी लागणार
जुहू बीचवर फिरायला जायचं असेल कोव्हिड टेस्ट करावी लागणार असे आदेश आता मुंबई महापालिकेने काढले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुहू बीचवर अँटीजन टेस्टिंग कॅम्पही लावण्यात आला आहे. चौपाटीवरचे फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याही टेस्ट केल्या जाणार आहेत. अॅन्टिजेन टेस्ट करूनच चौपाटीवर प्रवेश करता येईल अशी व्यवस्था तयार करण्यात येते आहे. […]
ADVERTISEMENT

जुहू बीचवर फिरायला जायचं असेल कोव्हिड टेस्ट करावी लागणार असे आदेश आता मुंबई महापालिकेने काढले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जुहू बीचवर अँटीजन टेस्टिंग कॅम्पही लावण्यात आला आहे. चौपाटीवरचे फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याही टेस्ट केल्या जाणार आहेत.
अॅन्टिजेन टेस्ट करूनच चौपाटीवर प्रवेश करता येईल अशी व्यवस्था तयार करण्यात येते आहे. यासाठी स्थानिक पोलीस आणि क्लिनअप मार्शल यांचीही मदत घेतली जाणार आहे. चौपाटीवर फिरायला येणाऱ्यांनी मास्क घातला नसेल तरीही कारवाई केली जाणार आहे.
होळी साजरी करु नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आदेश
जुहू चौपाटीवर करण्या येणाऱ्या कोव्हिड चाचण्यांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या आणि मुंबईतल्या लोकांचंही आकर्षण हे जुहू चौपाटी आहे.










