अवैध वाळू उपशावरून अधिवेशनात खडाजंगी होऊनही भीमा नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरूच
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पंढरपूर मंगळववेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवतडे यांनी मतदार संघात अवैध वाळू उपसा ,दारू धंदे, जुगार ,गुटखा हा राजरोस पणे विकला जात असल्याची तक्रार गृहराज्यमंत्र्यकडे केली. अधिवेशनात यावरून खडाजंगीही झाली. यामध्ये एकट्या मंगळवेढ्यात 800 पेक्षा जास्त दारू धंदे असल्याचा गंभीर आरोप आमदार आवताडे यांनी केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री […]
ADVERTISEMENT
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पंढरपूर मंगळववेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवतडे यांनी मतदार संघात अवैध वाळू उपसा ,दारू धंदे, जुगार ,गुटखा हा राजरोस पणे विकला जात असल्याची तक्रार गृहराज्यमंत्र्यकडे केली. अधिवेशनात यावरून खडाजंगीही झाली. यामध्ये एकट्या मंगळवेढ्यात 800 पेक्षा जास्त दारू धंदे असल्याचा गंभीर आरोप आमदार आवताडे यांनी केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री यांना धारेवर धरत प्रशासन अवैध व्यवसायाला पाठीशी घालत असल्याचा आरोपाने खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
यापूर्वी अवैध वाळू उपश्यामुळे राज्यात अनेक महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांचे जीव गेले आहेत. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर अवैध वाळू उपसा करण्यावबातचे रेट कार्डच विधिमंडळात वाचलं . तर आमदार भास्कर जाधव यांनी वाळू माफियांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला. या मुद्द्याने हिवाळी अधिवेशनात वातावरण गरम झाले असले तरी ही वाळू माफिया कोणालाही न घाबरता मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करताना दिसत आहेत.
हे वाचलं का?
जवळपास शेकडोच्या वर गाढवे आणि पीकअप वाहने भीमा नदी पात्राततून वाळू उपसा करीत आहेत.त्यांना ना पोलीस प्रशासनाची भीती ना महसूल प्रशासनाची भीती..
ADVERTISEMENT
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भिवरा नदीचा आपल्या भाषणात उल्लेख केला त्या नदीतून कधी थांबणार हा वाळू उपसा अशी भावना पंढरपूरचे नागरिक आणि भाविक करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT