IMD कडून रेड अलर्ट! राज्यात १३ एनडीआरएफ, तर २ एसडीआरएफच्या तुकड्या तैनात
महाराष्ट्रभर मान्सून व्यापला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील दोन पावसाचा जोर कायम राहणार असून, आज दिवसभरात सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशाऱ्या हवामान विभागाकडून देण्यात आलाय. ठाण्यातील मुंब्रा परिसरात भूस्खलन होऊन भिंत कोसळली ठाण्यातील मुंब्रा परिसरातील ठाकूरपाडा पारसिक बोगदा या ठिकाणी आनंद सोसायटीची संरक्षण भिंत पडली. संरक्षण भिंत […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रभर मान्सून व्यापला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील दोन पावसाचा जोर कायम राहणार असून, आज दिवसभरात सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशाऱ्या हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
ADVERTISEMENT
ठाण्यातील मुंब्रा परिसरात भूस्खलन होऊन भिंत कोसळली
ठाण्यातील मुंब्रा परिसरातील ठाकूरपाडा पारसिक बोगदा या ठिकाणी आनंद सोसायटीची संरक्षण भिंत पडली. संरक्षण भिंत १२ फुट लांब व ८ फुट उंचीची होती. संततधार पडत असलेल्या पावसामुळे ही भिंत असलेल्या जमिनीचा काही भाग खचला आणि त्यामुळे भिंत पडली. ही संरक्षण भिंत पडल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त (मुंब्रा प्रभाग समिती), कनिष्ठ अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १- रेस्क्यु वाहनासह घटनास्थळी उपस्थित राहून मलबा हटवण्याचे काम करत आहे.
हे वाचलं का?
राज्यात १३ एनडीआरएफ, तर २ एसडीआरएफच्या तुकड्या तैनात
हवामान विभागाकडून राज्यातील सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा, तर इतर काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून, राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफच्या १३ तुकड्या, तर एसडीआरएफच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
यात मुंबईत (कांजुरमार्ग १, घाटकोपर १) एनडीआरएफच्या तुकड्या, पालघर जिल्ह्यात १ तुकडी, रायगडमध्ये (महाड) २ तुकड्या, ठाण्यात २ तुकड्या, रत्नागिरीतील चिपळूणमध्ये २ तुकड्या, कोल्हापूरमध्ये २ तुकड्या, साताऱ्यात १ तुकडी, सिंधुदुर्गमध्ये १ तुकडी आदी ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नांदेड आणि गडचिरोलीमध्ये एसडीआरएफची प्रत्येकी १ तुकडी तैनात करण्यात आलेली आहे.
राज्यात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी ३२ फूट ६ इंचावर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पंचगंगेला पूर येण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील एकुण २७ बंधारे भरले आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकलाय. राज्यात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज असून, आगामी काही दिवसांत राज्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोकण, कोल्हापूर सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून, आज अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यात पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मुंबई शहर आणि परिसरात आज दिवसभरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे.
७ जुलै २०२२
हवामान अंदाज :-.
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरीता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडेल.अधूनमधून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 7, 2022
Heavy Rain alert in Maharashtra :
राज्यात पावसाचा धुमाकूळ! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक, चंद्रपूर या जिल्ह्यांतही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
6 July: येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता.
या कालावधीत कोकण,मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता.
Day 5 कोकण,मध्य महाराष्ट्र,विदर्भात जोरदार पाऊस
– IMD pic.twitter.com/xpt94qZqNf— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 6, 2022
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT