Pakistan : पाकिस्तानात इम्रान सत्तेचा अंत, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे इम्रान खान यांना त्यांचं पंतप्रधानपद गमवावं लागलं आहे. इम्रान खान यांचं सरकार पडल्याने आता ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकणार नाहीत. पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला गेला होता. त्यामध्ये इम्रान खान यांचा पराभव झाला. इम्रान खान यांच्या विरोधात १७४ मतं पडली. एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांची विकेट घेणारे इम्रान खान हे राजकीय मैदानावर मात्र क्लिन बोल्ड झाले आहेत.

ADVERTISEMENT

पंतप्रधान इम्रान खान यांना मानसिक आजार, त्यांना लवकर अटक करा -मरियम शरीफ

नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री 12 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. आता इम्रान खान यांचे सरकार पडल्यावर पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान शाहबाज शरीफ होणार आहेत. पंतप्रधानपदासाठी विरोधकांनी शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

पाकिस्तानात आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. अविश्वास प्रस्ताव येऊन पंतप्रधानपद सोडावं लागलेले इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या विरोधात मतदान होणार याची त्यांना पूर्ण कल्पना असावी कारण त्यांनी शनिवारीच पंतप्रधान निवास सोडले होते. एवढंच नाही तर इम्रान खान यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच सभापतींनीही राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी दुसरा नेता स्पीकरच्या खुर्चीवर बसला. पाकिस्तानातल्या संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेब्लीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मतदान झाले. ज्यामध्ये इम्रान खान यांचा पराभव झाला आणि त्यांना त्यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गमवावी लागली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अविश्वास प्रस्ताव जिंकल्यानंतर पाकिस्तानचे भावी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना इशाराच दिला आहे. आम्ही कधीही कुणावर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करणार नाही, तसंच निष्पा लोकांना तुरूंगात जावं लागणार नाही मात्र कायदा आपलं काम करणार हे लक्षात असू द्यावं असं शरीफ यांनी इम्रान खान यांना सुनावलं आहे. शहाबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षाचे नेते आहेत. ते म्हणाले की पाकिस्तानमधल्या कोट्यवधी आया-बहिणी आणि ज्येष्ठांची दुवा आज अल्लाहने कबूल केली आहे. पाकिस्तानात आजपासून नवी पहाट झाली आहे. पाकिस्तानात आम्ही कायद्याचं राज्य आणू असंही शरीफ यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT