Shiv Sena: ‘अडचणीत सापडले की, ते शत्रूला अधिक घातक ठरतात; ठाकरे ही याच वर्गातील माणसे’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘जर्मन सेनापती जनरल रोमेलविषयी अशी ख्याती होती की, तो अडचणीत सापडला की, शत्रूला अधिक घातक ठरे. काही व्यक्तींचे रसायनच असे असते की, संकट काळात त्यांची गुणवत्ता आणि राष्ट्रनिष्टा उसळून येते. टिळक, गांधी, चर्चिल, सावरकर, ठाकरे ही या वर्गातील माणसे’ असं मत शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या (Saamana) रोखठोक या विशेष सदरातून संजय राऊत यांनी आपल्या लेखातून भाजपवर थेट निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आपल्या लेखात असंही म्हटलं आहे की, ‘राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही. चुका करणाऱ्या राजाला सत्य, परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा.’ त्यांच्या संपूर्ण लेखाचा रोख हा थेट मोदी समर्थकांकडेच असल्याचं दिसून येत आहे.

अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir) जमीन व्यवहाराप्रकरणी सामनाच्या अग्रलेखातून काही सवाल उपस्थित केल्यानंतर भाजप (BJP) आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याची काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. हीच गोष्ट केंद्रबिंदू ठेऊन संजय राऊतांनी आपल्या लेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

अनेकजण स्वबळाचा नारा देत आहेत पण हे फक्त निवडणुकांपुरतं असू नये – उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

पाहा संजय राऊतांनी आपल्या लेखातून नेमकं काय म्हटलं आहे:

ADVERTISEMENT

  • देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे. स्वामीनिष्ठा ही राजनिष्ठा असू शकते. पण त्यास देशभक्ती कसे म्हणता?

ADVERTISEMENT

  • राम मंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे आपचे खासदार संजय सिंह यांनी समोर आणले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली. संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

  • मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदूद्रोही, राजद्रोही वैगरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे.

  • देशनिष्ठा की राजनिष्ठा हा वाद सनातन काळापासून सुरुच आहे. आज जे नरेंद्र मोदींवर निष्ठा ठेवत नाहीत ते देशाचे नाहीत असे बोलले जाते. कधी काळी मोदींच्या जागी इंदिरा गांधी होत्या. ‘इंदिरा इज इंडिया, इंदिरा म्हणजेच भारत’ ही घोषणा त्याच राजनिष्ठेतून निर्माण झाली. त्याच इंदिरा गांधींचा पराभव 1978 साली हिंदुस्थानी मतदारांनी केला.

  • ठाकरे सरकार जाईल सांगणाऱ्यांना उद्धव ठाकरे उत्तर देणार-संजय राऊत

    • द गॉल हे एक मानी स्वभावाचे गृहस्थ होते. दुसऱ्य़ा महायुद्ध काळात त्यांच्या सत्यवादाचा कस लागला. हिटलरच्या संभाव्य हल्ल्याच्या प्रतिकारार्थ तेव्हाच्या फ्रेंच सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून मॅजिनो तटबंदी उभारली.

    • ही तटबंदी अभेद्य आहे, असा डंका फ्रेंच सरकारी तज्ज्ञ पिटत असतानाच द गॉलने एक पुस्तक लिहून मॅजिनो तटबंदी कशी कुचकामी आहे हे पुराव्यासह दाखवून दिले.

    • फ्रेंच सरकार व लष्करी अधिकारी द गॉलवर भडकले व तो देशनिष्ठ नसल्याचा अपप्रचार सुरू केला, पण द गॉलचेच म्हणणे शंभर टक्के बरोबर होते. याचा अनुभव फ्रान्सने लगेच घेतला. जर्मन फौजांनी स्वारी केली.

    • मॅजिनो तटबंदी जर्मन फौजेला चार दिवसही रोखू शकली नाही. द गॉलने सत्य सांगितले यापेक्षा राष्ट्रनिष्ठा दुसरी कोणती असू शकते?

    Shivsena Foundation Day : ‘शिवसेना मुंबई- ठाण्याच्या पुढे जाणार नाही असंही लोक म्हणायचे’

    • जर्मन सेनापती जनरल रोमेलविषयी अशी ख्याती होती की, तो अडचणीत सापडला की शत्रूला अधिक घातक ठरे.

    • काही व्यक्तीचे रसायनच असे असते की संकट काळात त्यांची गुणवत्ता आणि राष्ट्रनिष्ठा उसळून येते. टिळक, गांधी, चर्चिल, सावरकर, ठाकरे ही या वर्गातील माणसे. द गॉल यांचा वर्ग तोच.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT