मुंबईत वडापावसोबत उंदराने पळवलं १० तोळे सोनं, पोलिसांनी घेतला फिल्मी स्टाईल शोध

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या गोकुळधाम सोसायटीच्या जवळ एका उंदराने वडापावसोबत दहा तोळे सोनं पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. पोलीस उप निरीक्षक जी घारगे यांनी यांनी ही माहिती दिली. सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला. काही उंदरांनी वडापावसोबत कचऱ्याची बॅगही गटारात नेली. त्यात दहा तोळे सोनं होतं.

ADVERTISEMENT

नेमका प्रकार काय घडला?

दिंडोशी भागात राहणाऱ्या सुंदरी प्लानिबेल यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १० लाख रूपये कर्ज घेतलं होतं. हे कर्ज फेडण्यासाठई बँकेत सोन्याचे दागिने त्या बँकेत तारण ठेवणार होत्या. तीन दिवसांपूर्वी बँकेत जात असताना राम नगर या ठिकाणी चुकून वडा पावसोबत दागिन्यांची पिशवीही त्यांनी भिक्षेकरी महिलेला दिली.

हे वाचलं का?

त्यांना ही बाब लक्षातही आली नाही की आपण त्या भिक्षेकरी महिलेला वडापावसोबत सोन्याचीही पिशवी दिली आहे तेव्हा ती त्या ठिकाणी परत आली. यानंतर ही महिला पोलिसात गेली. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी त्या भिक्षेकरी महिलेला शोधलं. मात्र सोन्याची पिशवी तिच्याकडेही नव्हती. वडापाव सुकलेला होता त्यामुळे मी ती पिशवी कचरापेटीत टाकून दिली असं त्या महिलेने सांगितलं.

ADVERTISEMENT

यानंतर दिंडोशी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं. या भिक्षेकरी महिलेने ज्या ठिकाणी कचरा फेकला होता ती जागाही तपासली. सीसीटीव्हीतही ही महिला कचरा पेटीत पिशवी फेकून दिल्याचं दिसतं आहे. त्यानंतर ही पिशवी एक उंदिर घेऊन जात असल्याचंही पोलिसांना दिसलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कचरा कुंडीजवळ असलेल्या गटारातून सोन्याचे दागिने असलेली पिशवी बाहरे काढली आणि महिलेला दागिने सोपवले.

ADVERTISEMENT

भिक्षेकरी महिलेने जेव्हा कचरापेटीत पिशवी फेकली तेव्हा त्यात या महिलेचे सोन्याचे दागिनेही गेले. हे दागिने उंदीर घेऊन जाताना दिसतो आहे. सीसीटीव्हीत पोलिसांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा पोलिसांनी त्या गटारातून ही पिशवी बाहेर काढली आणि महिलेचे दागिने तिच्याकडे सोपवले. त्यामुळे तिचा जीव भांड्यात पडला आहे. महिलेचे जे दागिने हरवले आणि परत मिळाले त्यात सोन्याच्या चेन, अंगठ्या आणि कानातल्यांचा समावेश आहे. या सगळ्याची किंमत पाच लाख रूपये आहे. हे सोनं तारण ठेवून महिला कर्ज घेणार होती. त्यासाठी बँकेत जात असतानाच ही घटना घडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT