No Mask, No Ticket: राष्ट्रवादीत यापुढे ‘नो मास्क, नो तिकीट’, सुप्रिया सुळेंनी भर सभेतच दिला आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे

ADVERTISEMENT

इंदापूर: बाजारपेठेतल्या एखाद्या दुकानात प्रवेश करताना ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असा बोर्ड आपण नेहमी पाहतो त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या आगामी निवडणुकांमध्ये ‘नो मास्क, नो तिकीट’ (No Mask, No Ticket) संकल्पना राबविली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी येत्या निवडणुकांमध्ये ही संकल्पना प्रत्यक्षपणे राबवावी अशी सूचना जिल्हाध्यक्षांना दिली आहे.

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर पुन्हा राजकीय कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

या कार्यक्रमांमधून कार्यकर्ते आणि पदाधिकारी विनामास्क वावरताना दिसतात. अनेकदा सूचना दिल्यानंतर देखील पदाधिकाऱ्यांमध्ये काही बदल होताना दिसत नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आता ही नवीन संकल्पना पुढे आणली आहे.h

Corona Protection: दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्क का आहे आवश्यक?

ADVERTISEMENT

पाहा सुप्रिया सुळेंनी नेमके काय आदेश दिले

ADVERTISEMENT

‘यापुढे होणाऱ्या कार्यक्रमात पदाधिकारी वारंवार विनामास्क दिसल्यास त्याला जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे तिकीटच देऊ नका.’ अशी सूचना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना केली आहे.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘गेल्या दीड वर्षात उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा चेहरा तुम्ही सर्वांनी पाहिला देखील नसेल. कारण अजितदादांचा मास्क दीड वर्षात खाली नाही आला. अपरिहार्य कारणामुळे मास्क काढावाच लागला तरी ते काही सेकंदात पुन्हा घालतात.’

Double Mask: आता वेळ आली डबल मास्क घालण्याची, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; नाहीतर…

‘माझी विनंती आहे जिल्हा अध्यक्षांना ज्या कार्यकर्त्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील त्यांना आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीटच देऊ नका.’ असे थेट आदेशच सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे किमान तिकिटासाठी तरी पदाधिकारी हे मास्क घालून वावरतील अशी आपण आशा करुयात.

Face mask: मुंबईकर कधी सुधारणार?, विना मास्क फिरणाऱ्यांकडून ‘एवढ्या’ कोटींचा दंड वसूल

मास्कमुळेच होऊ शकतो कोरोनापासून बचाव

कोरोनापासून बचाव करायचा असेल तर मास्क हा अत्यंत गरजेचा आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कोरोना व्हायरसने आपले स्वरुप देखील बदललं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी दोन मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. अशावेळी जर आपण मास्कच वापरला नाही तर कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच आता सुप्रिया सुळे यांनी नो मास्क, नो तिकीट असा आदेश काढला आहे.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावात त्या कार्यक्रमादरम्यान बोलताना सुप्रिया सुळे यांनी कोरोनाबाबत बोलत असतानाच मोदी सरकारवर देखील टीका केली. ‘गेलं दीड वर्ष आणि पुढचं एक वर्ष मोदी साहेबांनी आमचा खासदार निधी कट केला.’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT