पुणे जिल्ह्यात २२२ मशिदी आणि ९६ मंदिरांना पोलिसांनी दिली भोंगे लावण्याची संमती

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या अल्टीमेटम नंतर आज राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने २२२ मशिदी तर ९६ मंदिरांवर स्पीकर लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील २२६ मशिदींनी आणि ९९ मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यापैकी २२२ मशिदी आणि ९६ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या अल्टीमेटम नंतर आज राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या वतीने २२२ मशिदी तर ९६ मंदिरांवर स्पीकर लावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील २२६ मशिदींनी आणि ९९ मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यापैकी २२२ मशिदी आणि ९६ मंदिरांना पोलिसांनी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात भोंग्यावरून राजकारण तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर हे भोंगे हटविले नाहीत, तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशारा त्यांनी दिला.

या इशाऱ्यामुळे पुणे जिल्ह्यातील मशिदींच्या व्यवस्थापनाने मोठ्या संख्येने भोंग्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे अर्ज केले होते. त्याचबरोबर मंदिरांच्या व्यवस्थापनानेही स्पीकर परवाना मिळण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केले होते.

आता २२२ मशिदी आणि ९६ मंदिरे यांना ही परवानगी दिली आहे. पण अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण कायद्याची मर्यादा घालून दिली आहे, त्या मर्यादेचे त्यांना पालन करावे लागणार आहे. या अटीवरच ही परवानगी देण्यात आली आहे. आपल्या धर्मातील प्रार्थनास्थळा समोर लाऊड स्पीकर लावताना कोणतीही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp