मुंबईकरांनो जरा सांभाळा, गेल्या 24 तासात सापडले 11 हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती ही अत्यंत बिकट होत चालली आहे. कारण कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. कारण गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 11 हजार 779 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 25 पॉझिटिव्ह रुग्ण हे दगावले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

मागील काही महिन्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही काहीशी घटली होती. पण आता प्रचंड वेगाने कोरोनाने मुंबईत हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आता कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मुंबईकरांना अधिक सजग राहावं लागणार आहे.

दरम्यान, आज (4 एप्रिल) दिवसभरात 5 हजार 263 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 71 हजार 628 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 82 टक्के आहे. डबलिंग रेट 42 दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा, तर उद्यापासून कठोर निर्बंध होणार लागू

सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे सध्या मुंबईत 68 हजार 052 हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईतील आरोग्य सुविधेवर बराच ताण निर्माण झाला आहे. मुंबई आतापर्यंत 11 हजार 776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, आज दिवसभरात मुंबईत 51 हजार 319 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ज्यापैकी 11 हजाराहून अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक, गेल्या 24 तासात सापडले ‘एवढे’ पॉझिटिव्ह रुग्ण

सध्या मुंबईत 1 हजार 899 आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. तर 1 हजार 168 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. याशिवाय 9 हजार 841 ऑक्सिजन बेड्स देखील तयार आहेत. मात्र असं असलं तरीही मुंबईत झपाट्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या ही मुंबई महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे.

सध्या मुंबईमध्ये 74 कंटेन्मेंट झोन आहेत. जे पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. तर संपूर्ण मुंबईत 700 इमारती सील करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत असंही आढळून आलं आहे की, झोपडपट्ट्या आणि चाळींपेक्षा इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता त्यादृष्टीने तपासण्या सुरु केल्या आहेत.

राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा, कठोर निर्बंध होणार लागू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ मंत्री परिषद बोलावली होती. या मंत्री परिषदेनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती देताना स्पष्ट केलं की, तूर्तास राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसेल. पण उद्या (5 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून कठोर निर्बंध असणार आहेत. तसंच 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT