रशिया युक्रेन युद्धाचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स 1458 तर निफ्टी 387 अंकांनी कोसळला

मुंबई तक

युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष टीपेला पोहचला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे की शस्त्र खाली टाका अन्यथा आम्ही बघून घेऊ. एवढंच नाही तर युक्रेनच्या विरोधात सैन्यही त्यांनी उतरवलं आहे. याचा परिणाम आता भारतातल्या शेअर बाजारावर झाला आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष टीपेला पोहचला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे की शस्त्र खाली टाका अन्यथा आम्ही बघून घेऊ. एवढंच नाही तर युक्रेनच्या विरोधात सैन्यही त्यांनी उतरवलं आहे. याचा परिणाम आता भारतातल्या शेअर बाजारावर झाला आहे.

रशियाच्या हल्ल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजार 1458 अंकांनी कोसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही 387 अंकांची घसरण झाली आहे. तर ICICI बँकेचे शेअर्स उघडताच 4 टक्क्यांनी खाली आले आहेत. सर्व सेक्टोरियल इंडेक्स (Sectorial Index) घसरणीच्या लाल चिन्हात बुडलेले आहेत.

देशांतर्गत शेअर बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 1813 अंकांच्या जबरदस्त घसरणीसह 55,418 वर उघडला. तर निफ्टी 514 अंकांच्या घसरणीसह 16,548 वर उघडला आहे.

शेअर मार्केटच्या प्री-ओपनिंग सेशनमध्येच आज बाजारात मोठी पडझड होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. प्री-ओपन सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 1,800 अंकांपेक्षा जास्त म्हणजेच, 3.15 टक्क्यांनी घसरला होता. NSE निफ्टीतही 500 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 1300 हून अधिक अंकांची घसरणीत झाली. सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 55,750 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 350 हून अधिक अंकांनी घसरून 16,700 च्या खाली आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp