India Today Conclave Mumbai : ते कबूल कसं करतील?, उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा प्रहार
एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्षा आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांना गद्दार म्हणत डिवचलं. इतकंच नाही, तर हे खोके सरकार आहे, असाही आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२२ मध्ये झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर […]
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्षा आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांना गद्दार म्हणत डिवचलं. इतकंच नाही, तर हे खोके सरकार आहे, असाही आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२२ मध्ये झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर प्रहार केला.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्याकडून हे खोके सरकार असल्याचा तसेच गद्दारांचं सरकार असल्याचा आरोप सातत्यानं होतोय. उपयोग संपल्यानंतर शिंदे गटाला भाजप सोडून देईल, असंही ते म्हणताहेत. तुम्ही याकडे कसं बघता असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) बोलण्यासाठी दुसरं काय आहे? दोनच तर आहे. एक खोके आणि दुसरं गद्दार. पण आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही लोकांनी क्रांती केलीये. हा खूप मोठा उठाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे का झालं?”, असा उलट सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केलाय.
हे वाचलं का?
India Today Conclave 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बंडानंतरची रोखठोक मुलाखत
“पैसे देऊन दोन-पाच लोकांना फोडू शकतो. पन्नास लोक एकाच वेळी एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे जातात. तर त्यात चूक कुणाची आहे, हे शोधण्याऐवजी आरोप लावण्याचं कारण म्हणजे कारण त्यांना माहितीये की चूक त्यांची आहे. ते कसं म्हणू शकतात की माझी चूक आहे. मी चूक सुधारली नाही. असं कुणी कबुल करत का? नाही करू शकत’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
‘नंतर मुंबईत खड्डे शोधावे लागतील’, एकनाथ शिंदेंनी सांगितली ‘खड्डेमुक्त मुंबई’ची डेडलाईन
ADVERTISEMENT
“जी चूक झालीये, त्याचं आत्मपरिक्षण करायला हवं. या ५० लोकांनी का असं केलं. जे सत्तेत होते. सत्ता सोडून गेले. त्यावेळी तर आम्हालाही माहिती नव्हतं काय होणार? लोक अंदाज व्यक्त करत होते की, संपणार”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT