Tauktae Cyclone चा फटका बसलेलं Barge P 305 सापडलं
तौक्ते चक्रीवादळाचा जो तडाखा मुंबईजवळच्या बॉम्बे हायला बसला त्यात तिथे काम करत असलेल्या Barge P305 ला जलसमाधी मिऴाली. या घटनेला आता एक आठवडा उलटत असताना भारताच्या नौदलाला य़ा बुडालेल्या Barge P305 चा शोध लावण्यात यश मिळाले आहे. बार्ज P 305 Accident : कंपनीला कामावर असणाऱ्या लोकांच्या जिवाची किंमत नाही, बेपत्ता कर्मचाऱ्याच्या भावाचा आरोप Barge P305 […]
ADVERTISEMENT
तौक्ते चक्रीवादळाचा जो तडाखा मुंबईजवळच्या बॉम्बे हायला बसला त्यात तिथे काम करत असलेल्या Barge P305 ला जलसमाधी मिऴाली. या घटनेला आता एक आठवडा उलटत असताना भारताच्या नौदलाला य़ा बुडालेल्या Barge P305 चा शोध लावण्यात यश मिळाले आहे.
ADVERTISEMENT
बार्ज P 305 Accident : कंपनीला कामावर असणाऱ्या लोकांच्या जिवाची किंमत नाही, बेपत्ता कर्मचाऱ्याच्या भावाचा आरोप
Barge P305 कसे सापडले?
हे वाचलं का?
समुद्राच्या तळाशी या Barge P305 चे अवशेष नौदलाच्या पाणबुड्यांच्या टीमला आढळून आले आहेत. शनिवारी संध्याकाळी नौदलाला या Barge P305 चे अवशेष समुद्रात सापडले.
Barge P305 वर एकूण 261 लोकं होती त्यातल्या 186 जणांची सुटका करण्यात आली आहे तर 66 जण मृत्यूमुखी प़डले आहेत आणि 9 जण अजूनही बेपत्ता आहेत.
ADVERTISEMENT
Barge P305 वर काम करण्यारे 20 जण बेपत्ता असून नौदल त्यांचा शोध घेत आहे. या 20 जणांमध्ये Barge P305 वरच्या 9 जणांचा तर वरप्रदा या टगबोटवरच्या 11 जणांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
नौदलाकडून विशेष टीम तैनात –
भारतीय नौदलाकडून Barge P305 चा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांची विशेष टीम तैनात करण्यात आली होती. आय़एऩएस मकरवर तैनात असलेल्या या पाणबुडयांच्या स्पेशल टीमकडे शोधमोहीमेसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपकरणे होती. यामध्ये साईड स्कँन सोनारसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा समावेश होता.
या आय़एऩएस मकरच्या या टीमला समुद्रतळाशी गेलेल्या या Barge P305 शोध लावण्यात यश आले आहे अशी माहिती नौदलाने दिली.
जी टगबोट या Barge P305 ला वाहून नेत होती त्या टगबोटीवर एकूण 13 जण होते त्यातल्या 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे तर 11 जण बेपत्ता आहेत.
भारतीय नौदलाकडून आयएनएस कोची, कोलकाता, बियास, तेग, P8I एअरक्राफ्ट, चेतक, हेलिकॉप्टर्स, कोस्टगार्डची टीम इतकी मोठी यंत्रणा या शोधकार्यात गुंतलेली आहे. 17 मे ला सुरु झालेली ही शोध मोहीम अव्याहत सुरु आहे.
किती लोकं अडकले होते समुद्रात?
आत्तापर्यंत barges Gal Constructor, Support Station 3 (SS-3) आणि drillship Sagar Bhushan येथे काम करत असलेल्या 440 जणांना समुद्र किनाऱ्यावर सुखरुप आणले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने 3 सदस्यीय चौकशी समिती या प्रकरणी नेमली असून ही समिती हा बार्ज कसा बुडाला किनाऱ्यावर का परतला नाही याची चौकशी करणार आहे.
नऊ तास Tauktae वादळाशी झुंज देऊन सातारचा पठ्ठ्या सुखरुप घरी
मृतदेहांची होणार डीएऩए चाचणी
आत्तापर्यंत या अपघातात जे 66 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत त्या मृतदेहांची ओळख पटवणे अवघड होत आहे. नौदलाने हे मृतदेह मुंबई पोलीसांकडे सोपवले आहेत. त्यामुळे या मृतदेहांची DNA चाचणी होणार आहे. त्य़ासाठी संबंधित नातेवाईकांचे DNA सँपल घेण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 41 मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. पुढच्या तीन दिवसात हे डीएनए टेस्टिंग पुर्ण होणार आहे. तसेच कोरोनाची तपासणी कऱण्यासाठी या मृतदेहांच्या RT-PCR टेस्ट देखील करण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT