इंदुरीकर महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; “त्यांचं वाटोळ होणार, मुलं…” पाहा व्हिडीओ

मुंबई तक

वादग्रस्त विधानं आणि आपल्या अनोख्या किर्तन शैलीच्या आधारे नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसत आहेत. अकोला येथील एका किर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी केलेलं विधान सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे. “माझ्या जीवावर ४ हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, काहींना तर ते पैसीह मोजता येईनात. आज याच लोकांनी मला अडचणीत आणलं. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वादग्रस्त विधानं आणि आपल्या अनोख्या किर्तन शैलीच्या आधारे नेहमीच चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसत आहेत. अकोला येथील एका किर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी केलेलं विधान सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे.

“माझ्या जीवावर ४ हजार जणांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आहेत, काहींना तर ते पैसीह मोजता येईनात. आज याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल”, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी दिव्यांग मुलांसारखे हातवारे करुन दाखवले.

सोमवारी रात्री अकोला शहरातील कौलखेड भागात त्यांचं कीर्तन झालं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं.

पाहा नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

चार हजार यूट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि हे नंतर माझ्यावरच चढले. माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल (दिव्यांग मुलांसारखे हातवारे करत) हा विनोद नाही, जे सत्य आहे ते…

याआधीही इंदुरीकर महाराज अशाच प्रकारच्या वक्तव्यांमुळे अडचणीत आले होते. राज्यातील अनेक महिला कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांच्या किर्तनातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यांवर आक्षेप घेत तक्रार केली होती. ज्यानंतर इंदुरीकर महाराजांची अनेक किर्तन सोशल मीडियावरुन हटवण्यात आली होती. त्यामुळे या विधानानंतर आता इंदुरीकर महाराजांवर काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp