आतली बातमी: शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीतील Inside Story… जशीच्या तशी!
मुंबई: प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार म्हणवले जाणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) जे राजकीय रणनीतिकार आहेत ते खास मुंबईत आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावरुन महाराष्ट्रात, देशात अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर प्रामुख्याने 3 […]
ADVERTISEMENT
मुंबई: प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार म्हणवले जाणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) जे राजकीय रणनीतिकार आहेत ते खास मुंबईत आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावरुन महाराष्ट्रात, देशात अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर प्रामुख्याने 3 प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण नक्की या बैठकीत काय झालं?
या बैठकीत जे झालं ती स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. याच बैठकीची इनसाइड स्टोरी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जशीच्या तशी..
हे वाचलं का?
प्रश्न पहिला: प्रशांत किशोर यांनी 2024 साली काय पद्धतीने रणनिती असली पाहिजे याबद्दलचं प्रेझेन्टेशन शरद पवार यांच्या समोर केलं का?
अजिबात नाही… प्रशांत किशोर हे कोणत्याही पद्धतीचं प्रेझेन्टेशन घेऊन आलेले नव्हते. अशा पद्धतीने प्रेझेन्टेशन घेऊन त्यांना बोलावण्यात देखील आलं नव्हतं. सुप्रिया सुळे आणि प्रशांत किशोर हे गेलो दोन वर्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रशांत किशोर यांना संपर्क साधला होता.
ADVERTISEMENT
त्यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही करता येईल का? याबद्दलची चर्चा करण्याकरिता सगळ्यात आधी म्हणजे 2019 साली मुंबई आमंत्रित करण्यात आलं होतं.
पण ही भेट झाली दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये या बैठकीला अजित पवार, प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते हे बैठकीला उपस्थित होते.
त्यांच्यासमोर बोलताना प्रशांत किशोर यांनी असं सांगितलं की, विधानसभा निवडणुका जरी लढवायच्या असतील तर त्या एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा त्या नेत्याला प्रोजेक्ट करुनच ती निवडणूक लढवा.
त्यानिमित्ताने प्रशांत किशोर यांनी असं सांगितलं की, शरद पवार यांचाच चेहरा हा विधानसभा निवडणुकीसाठी असला पाहिजे.
Prashant Kishor आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राला झाली चार राजकीय भेटींची आठवण
साहजिकच, शरद पवार यांनी या गोष्टीला नकार दिला. मी अशा पद्धतीने विधानसभेसाठी चेहरा होऊ शकत नाही. आम्हाला काही हे मंजूर नाही आम्ही अशा पद्धतीने काम करु शकत नाही. शेवटी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीसाठी काम नाही केलं.
अर्थात त्या वेळेस ते आदित्य ठाकरेंसोबत देखील चर्चेत होते. त्यांनाही त्यांनी काही टिप्स दिल्या होत्या.
आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी आदित्य संवाद असा एक कार्यक्रम केला होता. ज्यामुळे एनसीपीसोबत त्यांचं काही सूत जुळलं नाही. पण त्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रशांत किशोर हे मात्र संपर्कात होते.
2019 ला ऑक्टोबर महिन्यात जो काही राजकीय खेळखंडोबा महाराष्ट्रात चालला होता त्यादरम्यान सुद्धा सुप्रिया सुळे त्यांच्याशी संपर्कात होत्या. आता बंगाल विधानसभेचे निकाल जेव्हा समोर आले तेव्हा त्यांचे अनुभव लोकांसमोर ठेवण्यासाठी म्हणून मुंबईत त्यांना पवारांच्या घरी आमंत्रित करण्यात आलं होतं. ही भेट ‘लंच ऑन मीटिंग’ अशा स्वरुपाची होती.
विशेषत: या मीटिंगसाठी शरद पवार यांनी जयंत पाटील यांना बोलावून घेतलं होतं. पण यावेळी एकटे जयंत पाटील या बैठकीला नव्हते. तर रोहित पवार सुद्धा तिथे उपस्थित होते.
महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांचे जवळचे समजले जाणारे त्यांचे काही मित्र म्हणजे आर्किटेक्ट कादरी, ज्यांनी नेहरु सेंटरचं काम त्यांनी केलेलं आहे. ते सुद्धा त्यांच्या पत्नीसह या बैठकीला हजर होते. अर्थात ही लंच ऑन मीटिंग होती. पारंपारिक बैठक नव्हती.
या संपूर्ण मीटिंगमध्ये शरद पवार हे फारच कमी बोलले. त्यांच्याकडे काही फारसे प्रश्न नव्हते. पण जयंत पाटील आणि इतर लोकंच त्यांना अधिक प्रश्न विचारत होते. दरम्यान, पहिला प्रश्न हाच होता की, बंगालमध्ये एवढं देदीप्यमान यश कसं मिळवून दिलं.
यावर प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा त्यांना हेच सांगितलं की, एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला खात्री असेल तरच तुम्ही अशा पद्धतीचं यश मिळवू शकता. कुठेतरी क्षेत्रीय संवेदना या ममता बॅनर्जी यांच्या बाजूने होत्या त्यामुळे ममता बॅनर्जी यांना नेत्रदीपक यश मिळालं.
याचवेळी तामिळनाडू निवडणुकीची देखील चर्चा झाली. कारण या निवडणुकीत डीएमके आणि काँग्रेस हे एकत्र लढले. प्रश्न हाच होता की, काँग्रेसचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी सुधारावा यासाठी काँग्रेसला ज्या काही सीट्स दिल्या गेल्या ते कसं काय झालं? कारण सीट्स शेअरिंग हा आतापर्यंत नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे.
Prashant Kishor आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं नेमकं कारण आहे तरी काय?
त्यावेळी प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, ज्या ठिकाणी काँग्रेस निवडून येऊ शकतं अशाच ठिकाणी त्यांनी सीट्स घ्याव्यात यासाठी त्यांची समजूत घातली. शेवटी त्यांनी ज्या 25 सीट्स लढवल्या त्यापैकी 19 ठिकाणी विजय मिळवला.
ज्या पद्धतीने बिहारमध्ये जास्त सीट्स घेऊन कमी जागेवर विजय मिळाला होता. त्यामुळे असं म्हटलं जातं की, आरजेडी-काँग्रेसचं सरकार होऊ नाही शकलं. त्या पद्धतीची परिस्थिती तामिळनाडूत नाही झाली.
हा आत्मविश्वास तुम्ही कुठून आणता या प्रश्न देखील त्यांना यावेळी विचारला गेला. हा प्रश्न त्यांना यासाठी विचारला गेला कारण की, बंगाल निवडणुकीआधी प्रशांत किशोर हे सातत्याने सांगत होते की, बंगालमध्ये भाजपने तीन आकडी संख्या गाठली तर मी माझं काम पूर्णपणे सोडून देईन.
त्यांचं म्हणणं खरं ठरलं भाजपला तीन अंकी जागाही मिळवता आल्या नाही. त्यामुळेच त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर प्रशांत किशोर यांनी काही सविस्तर दिलं नाही. असं म्हणातात की, आपल्या कल्पना काही पूर्ण सांगायच्या नसतात. त्या काही आपल्याकडे पण ठेवायच्या असतात. कदाचित प्रशांत किशोर यांनी यावेळी तेच केलं असावं.
त्यामुळे पूर्ण बैठकीत कोणतंही प्रेझेन्टेशन झालं नाही. 2024 साठी प्रशांत किशोर हे काही रणनीति घेऊन आले होते असंही काही नव्हतं.
प्रश्न दुसरा: 2024 ला सर्व पक्ष एकत्र येण्याची तयारी सुरु झाली आहे का?
आपण एवढं नक्कीच म्हणू शकतो की, प्रशांत किशोर यांनी ही जी इच्छा आहे ती बोलून दाखवलेली आहे. प्रशांत किशोर यांनी हे देखील सांगितलं आहे की, आतापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे तसं काम आता ते करणार नाहीत हे त्यांनी बंगाल निवडणुकीनंतर स्पष्टच केलं आहे. त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे.
आता वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत त्यांना कुठे एकत्र आणता येईल का? यासंबंधी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. अशा पद्धतीने बोललं जात आहे.
साहजिकच आहे, काँग्रेस यामध्ये जोवर यात सामील होत नाही तोपर्यंत या प्रयत्नांना फारसं काही यश मिळू शकणार नाही. 2024 च्या निमित्ताने हे छोटे पक्ष आणि काँग्रेस यांना एकत्र आणता येईल का? याची चाचपणी सुरु झाली आहे. एवढं आपण नक्कीच म्हणू शकतो.
२०२४ नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील – भातखळकरांचा खोचक टोला
प्रश्न तिसरा: राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रशांत किशोर काम करणार का? जेणेकरुन शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात?
सध्या तरी या चर्चेत जाण्यात अर्थ नाही. कारण की, राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टच सांगितलं आहे की, प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीसाठी काम करणार नाहीत. नवाब मलिक यांनी ही भूमिकाच मांडली आहे.
शरद पवार यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे की, सात खासदार, नऊ खासदार, पाच खासदार अशी माझी संख्या असताना मी पंतप्रधान पदाची स्वप्नं पाहू शकत नाही. माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा बोलतात पण ही गोष्ट शक्य नाही.
शरद पवार हे प्रॅक्टिकल राजकारणी म्हणून ओळखले जातात. परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. पण त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात खासदारांची संख्या असणं गरजेचं आहे. ही गोष्ट सुद्धा शरद पवार हे चाणाक्षपणे जाणतात.
सगळ्यात महत्त्वाचं… शरद पवार यांना जे लोकं ओळखतात त्यांचं असं म्हणणं आहे की, अशा पद्धतीने राजकीय रणनीतिकार यांच्यासोबत काम करायला पवार हे फारसे उत्सुक नसतात.
प्रशांत किशोर यांच्या या बैठकीमुळे राजकारणात पुढे काय होणार हे सांगणं कठीण आहे. आपण फक्त सध्या एवढंच म्हणू शकतो की, सगळ्या पद्धतीच्या राजकारणाची चाचपणी सुरु झालेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT