IPL 2024 : आयपीएलचं उर्वरित वेळापत्रक जाहीर, कधी होणार फायनल?
IPL Full Schedule 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता आयपीएलचा फायनल सामना 26 मे रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे जर चेन्नई फायनलमध्ये पोहोचल्यास चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.
ADVERTISEMENT

IPL Full Schedule 2024 : यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक असल्या कारणाने आयपीएलच्या सुरूवातीच्या 21 सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र आता लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता आयपीएलचा फायनल सामना 26 मे रोजी चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे जर चेन्नई फायनलमध्ये पोहोचल्यास चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. (ipl 2024 full schedule playoff venue channai and ahmedabad ipl final date 26 may ma chidambaram stadium)
आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आणि आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. तसचे यंदा देशभरात लोकसभा निवडणूक असल्या कारणाने पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आयपीएलचे उर्वरीत वेळापत्रक जाहीर झाले आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : राम सातपुतेंचं नेमकं गाव कोणतं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार,आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तर दुसरा क्वालिफायर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक
1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई (चेन्नईने 6 विकेट्सने जिंकला)