पुणे पोलिसांच्या ठिकठिकाणी धाडी! दोघांना अटक, मुद्देमालासह ९२ लाख रुपये जप्त
पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विविध ठिकाणी धाडी टाकत पोलिसांनी दोन सट्टेबाजांसह तब्बल ९२ लाखांची रक्कम जप्त केली आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कलकत्ता नाईट रायडर्सच्या मॅचवर ऑनलाईन सट्टा प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. गणेश भिवराज भुतडा (वय 50, रा रस्ता पेठ) यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. […]
ADVERTISEMENT
पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विविध ठिकाणी धाडी टाकत पोलिसांनी दोन सट्टेबाजांसह तब्बल ९२ लाखांची रक्कम जप्त केली आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कलकत्ता नाईट रायडर्सच्या मॅचवर ऑनलाईन सट्टा प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
गणेश भिवराज भुतडा (वय 50, रा रस्ता पेठ) यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता पेठेतील त्रिमुर्ती सोसायटीत रविवारी रात्री क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता.
हे वाचलं का?
छापा टाकलेल्या ठिकाणी डायरी, मोबाईल, रोख रक्कम आढळून आली. तेथे असलेल्या आरोपी गणेश भिवराज भुतडा याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने अबुधाबी येथे सुरू असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कलकत्ता नाईट रायडर्सच्या मॅचवर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची कबुली दिली.
पुणे : LPG Gas चा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना रंगेहाथ पकडलं
ADVERTISEMENT
पोलिसांनी दोन ठिकाणांहून 92 लाख रोख रक्कम आणि 65 हजार किमतीचे मोबाईल, नोटा मोजण्याची मशीन, बनावट कागद पत्रे, सीमकार्ड आदी त्याठिकाणी आढळून आले. रोख रक्कम आणि मुद्देमाल असा एकूण 92 लाख 62 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी आणखी अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
पुणे : मराठे ज्वेलर्सचे मंजिरी आणि कौस्तुभ मराठे यांना अटक
मार्चमध्येही ३३ जणांना करण्यात आली होती अटक
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यातील सामना पुण्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यादरम्यान सट्टा लावणाऱ्या ३३ बुकींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे ३३ पैकी ८ जण हे घोरडेश्वर डोंगरावरून दुर्बिणीच्या मदतीने सामन्याच्या नोंदी घेत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT