‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

‘भाबीजी घर पर हैं’ हा प्रसिद्ध शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, हा शो अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील राहिला आहे.

हे वाचलं का?

कॉमेडी शोला एका विशिष्ट वर्गाने अश्लील, अडल्ट विनोद म्हटलं आहे. या आरोपांवर अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रे हिने प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

शुभांगीने इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत म्हटलं की, शोमध्ये काही दुहेरी अर्थाचे विनोद आहेत. पण अश्लीलता पसरवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.

ADVERTISEMENT

ती म्हणाली, ‘मीही हा शो कुटुंबासह पाहते. त्यामुळे आम्ही खात्री देतो की, यामध्ये कोणतीही अश्लीलता नाही.’

‘होय, कधीकधी हेल्दी फ्लर्टिंग असतं. एका कॉमेडी शोबाबत एवढी गोष्ट तरी ग्राह्य धरली पाहिजे.’

शुभांगीने म्हटलं की, ‘मी अंगूरी भाभीची भूमिका साकरत असल्याने माझे वडील हे खूपच उत्साहित आहेत.’

अभिनेत्रीने सांगितले की, कोव्हिड दरम्यान डॉक्टर रुग्णांना हा शो पाहण्यास सांगत असे. कारण त्यांच्यासाठी ही गोष्ट तणावापासून दूर राहण्यासाठी उपायकारक ठरत होती.

नुकतेच शुभांगी अत्रेने तिच्या पतीपासून वेगळे झाल्याचा खुलासा केला होता. या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

अभिनेत्रीला विचारण्यात आले की, तिच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव असूनही ती कॉमेडी शो कसे करते? त्यावेळी ती फक्त एकच म्हणाली की, ‘मी एक कलाकार आहे.’

‘माझी जबाबदारी काम करणे आहे. मी सेटवर वैयक्तिक आयुष्य आणत नाही. मी एक खाजगी व्यक्ती आहे.’

अशाच वेब स्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT