लोकांना वाचवण्यासाठी दुसरं औषध नाही का?; सोनू सूदचा डॉक्टरांना सवाल
कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सोदने गरीब तसंच अनेक गरजूंना मदत केली. सोनू फक्त लोकांची मदतच करत नाही तर संवेदनशील मुद्द्यांवर त्याची मतं देखील मांडतो. अशातच सोनू सूदने एक ट्विट करत थेट डॉक्टरांना सवाल केला आहे. सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, एक साधा प्रश्न आहे, जेव्हा प्रत्येकाला हे माहिती आहे की एक विशिष्ट इंजेक्शन कुठेही उपलब्ध […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सोदने गरीब तसंच अनेक गरजूंना मदत केली. सोनू फक्त लोकांची मदतच करत नाही तर संवेदनशील मुद्द्यांवर त्याची मतं देखील मांडतो. अशातच सोनू सूदने एक ट्विट करत थेट डॉक्टरांना सवाल केला आहे.
सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, एक साधा प्रश्न आहे, जेव्हा प्रत्येकाला हे माहिती आहे की एक विशिष्ट इंजेक्शन कुठेही उपलब्ध नाही, तेव्हा डॉक्टर लोकांना तेच इंजेक्शन घेण्याचा सल्ला का देत आहेत? रुग्णालयांना देखील हे औषध मिळत नाही तर सामान्य माणसाला हे कुठून मिळेल? लोकांना वाचवण्यासाठी आपण इतर कोणतेही औषध का वापरु शकत नाही? ”
One simple question:
When everyone knows a particular injection is not available anywhere,why does every doctor recommends that injection only?
When the hospitals cannot get that medicine then how will a common man get?
Why can't v use a substitute of that medicine &save a life?— sonu sood (@SonuSood) May 18, 2021
सोनू सूदने हे ट्विट रेमडेसिविर इंजेक्शनबद्दल केलं असल्याचं म्हटलं जातंय. याचबद्दल त्याने डॉक्टरांकडे प्रश्न केला आहे. सध्या सोनू सूदचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. त्याच्या या ट्विटवर यूजर्स ट्वीट करुन प्रतिक्रिया देत आहेत.
कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सोनू निगम पुढे सरसावला; ऑक्सिजन पुरवठ्याची करणार मदत









