सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचं सूचक विधान

मुंबई तक

राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. १ हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागा असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विकली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे. कोरोनामधून सावरल्यानंतर बारामतीत पत्रकारांशी बोलत […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. १ हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागा असलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विकली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

कोरोनामधून सावरल्यानंतर बारामतीत पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला तर माझी काही हरकत नसेल असं विधान केलं आहे.

माझ्या दृष्टीने हा फार महत्वाचा प्रश्नच नाही. आज देशात अनेक ठिकाणी सरकारची परवानगी घेऊन ही गोष्ट विकली जाते, त्याची दुकानं असतात. त्यात वाईनही असतेच. आता फक्त मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे ही चर्चा सुरु आहे. त्याला फार विरोध होत असेल आणि तो निर्णय आता थांबवला तरीही काही फरक पडत नाही, असं शरद पवार म्हणाले.

…तर मी स्वतः औरंगाबादची दुकानं फोडेन ! वाईन विक्रीच्या निर्णयाला इम्तियाज जलील यांचं आव्हान

हे वाचलं का?

    follow whatsapp