सुकेश चंद्रशेखरसोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोबाबत जॅकलिनने सोडलं मौन, म्हणाली….
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं आयुष्य सध्या समोर आलं आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचं व्यक्तिगत आयुष्य समोर आलं होतं. त्याची चर्चाही झाली. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिलेल्या भेटवस्तू यांचीही चर्चा झाली. शनिवारी जॅकलीन आणि सुकेश चंद्रशेखर यांचा आणखी एक इंटिमेट फोटो व्हायरल झाला. त्यात तिच्या गळ्यावर लव्ह बाईटही दिसल्याने त्याची प्रचंड चर्चा झाली. आता यावर […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं आयुष्य सध्या समोर आलं आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचं व्यक्तिगत आयुष्य समोर आलं होतं. त्याची चर्चाही झाली. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिलेल्या भेटवस्तू यांचीही चर्चा झाली. शनिवारी जॅकलीन आणि सुकेश चंद्रशेखर यांचा आणखी एक इंटिमेट फोटो व्हायरल झाला. त्यात तिच्या गळ्यावर लव्ह बाईटही दिसल्याने त्याची प्रचंड चर्चा झाली. आता यावर जॅकलिनने एक ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे जॅकलिनने?
‘या देशाने आणि तेथील जनतेने मला नेहमीच अपार प्रेम आणि आदर दिला आहे. यात माझ्या मीडियातील मित्रांचा समावेश आहे, ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आहे. मी सध्या कठीण काळातून जात आहे, पण मला खात्री आहे की माझे मित्र आणि चाहते मला यात साथ देतील,या आत्मविश्वासाने, मी माझ्या मीडिया मित्रांना विनंती करेन की, माझ्या गोपनीयतेवर आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणारे फोटो शेअर करू नका. तुम्ही स्वतःशी, तुमच्या प्रियजनांसोबत हे करणार नाही, मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासोबतही हे करणार नाही. आशा आहे की न्यायाचा आणि विजय होईल. धन्यवाद.’
— Jacqueline Fernandez (@Asli_Jacqueline) January 8, 2022