मोठी बातमी! नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची जैश-ए-मोहम्मदने केली रेकी
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपूरमधल्या संघ मुख्यालयाच्या इमारतीची जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. फक्त संघ मुख्यालयच नाही तर नागपूरमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचं समजतं आहे. संघ मुख्यालय, हेडगेवार भवन या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. तसंच रेशीमबाग या ठिकाणी हेडगेवार भवनही आहे. […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
नागपूरमधल्या संघ मुख्यालयाच्या इमारतीची जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. फक्त संघ मुख्यालयच नाही तर नागपूरमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचं समजतं आहे. संघ मुख्यालय, हेडगेवार भवन या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. तसंच रेशीमबाग या ठिकाणी हेडगेवार भवनही आहे. या दोन्ही ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी जैश ए मोहम्मदने केल्याचं समजतं आहे. तसंच या ठिकाणांचे फोटोही घेतले गेले आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. संघ मुख्यालय ही ती जागा आहे जिथे सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे महत्त्वाचे पदाधिकारी असतात. जैश ए मोहम्मद या संघटनेने या दोन इमारतींसह इतरही काही भागांची रेकी केली आहे.