जळगाव: एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला
मनीष जोग, जळगाव: मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष चालू असून त्यातच काल (27 डिसेंबर) रात्री राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी काही अज्ञातांकडून रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर खडसे समर्थकांची त्यांच्या घराजवळ बरीच गर्दी जमली होती. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, काल […]
ADVERTISEMENT

मनीष जोग, जळगाव: मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष चालू असून त्यातच काल (27 डिसेंबर) रात्री राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी काही अज्ञातांकडून रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर खडसे समर्थकांची त्यांच्या घराजवळ बरीच गर्दी जमली होती.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे या मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या कारवर अचानक काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
याप्रसंगी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा ड्रायव्हर असे एकूण तीन जण होते.