पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी, चाणाक्ष पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
मनीष जोग, जळगाव पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत दोन बहाद्दरांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्यामुळे दोघेही रंगेहाथ सापडले आहेत. योगेश रामदास आव्हाड ( रा. पांझणदेव, पो. नागपूर, ता. नांदगाव, जि. नाशिक) व प्रतापसिंग गुलचंद बालोद (रा. वैजापूर, ता. औरंगाबाद) अशी कॉपी करणाऱ्या दोघांची नावे असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा […]
ADVERTISEMENT

मनीष जोग, जळगाव
पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत दोन बहाद्दरांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्यामुळे दोघेही रंगेहाथ सापडले आहेत. योगेश रामदास आव्हाड ( रा. पांझणदेव, पो. नागपूर, ता. नांदगाव, जि. नाशिक) व प्रतापसिंग गुलचंद बालोद (रा. वैजापूर, ता. औरंगाबाद) अशी कॉपी करणाऱ्या दोघांची नावे असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज या परीक्षा केंद्रावर योगेश रामदास आव्हाड याने केंद्राच्या आवारातील सीसीटीव्ही व्हीडिओ कॅमेरे तसेच तपासणी करणाऱ्या पोलिसांची नजर चुकवून मोबाइल परीक्षा केंद्रात नेला होता.
प्रश्नपत्रिका मिळताच त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून मित्राच्या मोबाइलवर पाठवले. त्यानंतर मित्राने प्रश्नांची उत्तरे आव्हाडला पाठवली. त्यानुसार आव्हाड प्रश्नपत्रिका सोडवत होता. हा प्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परीक्षार्थी योगेश आव्हाड याला रंगेहाथ ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर अटकेची कारवाई केली.