पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे हा सध्या कारागृहात असून त्याची पत्नी मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.आता या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार काय भूमिका मांडणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील गुंड गजानन मारणे हा तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पुण्यापर्यंत जवळपास 300 चार चाकीने रॅली काढली होती. या रॅलीची चर्चा राज्यभरात सुरू होती.त्याच दरम्यान विविध कलमांअंतर्गत गजा मारणेवर गुन्हे दाखल करून, त्याला अटक देखील करण्यात आली. त्या एकूणच प्रकरणी एक वर्षा करिता त्याला स्थानबद्ध करण्यात आले. आता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. हे प्रकरण थांबत नाही. तोवर 2012 च्या निवडणुकीमध्ये कोथरूड भागातून गुंड गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे या मनसेमधून निवडून आल्या होत्या.त्यानंतर झालेल्या 2017 च्या निवडणुकीत जयश्री मारणे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

गजा मारणेला वडापाव पडला महागात, दरोड्याचा गुन्हा दाखल

हे वाचलं का?

आता महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना,जयश्री मारणे यांनी मनसेला राम राम करीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. आता या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार काय भूमिका मांडणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मारणे विरुद्ध मोहोळ – जाणून घ्या पुण्याच्या टोळीयुद्धाची कहाणी

ADVERTISEMENT

कोण आहे गजानन मारणे ?

ADVERTISEMENT

पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्याप्रकरणी गजा मारणेला २०१४ साली अटक करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे हे सुरुवातीला मारणे टोळीत काम करायचे. पण यानंतर त्यांनी मारणे टोळीतून फुटून दुसरीकडे काम करण्यास सुरुवात केली. यामधूनच दोघांचीही हत्या करण्यात आली होती. पप्पू आणि अमोल बधेच्या हत्येप्रकरणात गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळपासून मारणे तुरुंगात होता. सुरुवातीच्या काळात मारणेला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्याची रवानगी कोल्हापूर जेलमध्ये करण्यात आली. यानंतर त्याला तळोजा जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं.

पुणे आणि लगतच्या ग्रामीण भागात साधारण ९० च्या दशकात शेती व्हायची. त्या काळात लोकांच्या भावनाही शेतीशी जोडल्या होत्या. पण शेती करुन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा शेती विकून त्यातून करोडो पैसे मिळतात हे शेतकऱ्यांना समजायला लागलं. २००० नंतर पुण्याचा चेहरा बदलायला लागला. आयटी क्षेत्र पुण्यात यायला सुरुवात झाली होती त्यामुळे पुण्याच्या आजुबाजूच्या गावातील जमिनींना भाव यायला लागले. कॉर्पोरेट कंपन्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी एजंटची गरज भासायला लागली. मग यातून समोरच्या व्यक्तीला धमकावणं, जागा मोकळी करण्यासाठी बळाचा वापर करणं असे प्रकार वाढायला लागले आणि यातून मारणे, मोहळ, घायवळ अशा गँग तयार झाल्या. गजा मारणे हा मारणे गँगचा म्होरक्या आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT