जिओचं नेटवर्क डाऊन; ग्राहकांच्या तक्रारी, तर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील नामांकित दूरसंचार कंपनी असलेल्या जिओचं नेटवर्क डाऊन झालं आहे. जिओच्या वापरकर्त्यांकडून ट्विटरवर जिओ नेटकवर्कबद्दलच्या तक्रारी करण्यास सुरूवात झाल्यानंतर समोर आलं. डाऊनडिटेक्टरमध्येही जिओ नेटवर्कबद्दलच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे नेटवर्क डाऊन झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे.

ADVERTISEMENT

व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानं जगभरातील माहिती आणि संवाद ठप्प झाला होता. या सोशल माध्यमांची सेवा पूर्ववत होऊन 24 तास लोटत नाही, तोच आता जिओचं नेटवर्क डाऊन झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना नेटवर्कची समस्या भेडसावत असून, तशा तक्रारी ट्विटर व इतर माध्यमातून ग्राहक जिओकडे नोंदवू लागले आहेत. नेटवर्कची समस्या विशिष्ट सर्कलमध्ये आहे की, संपूर्ण देशात, याबद्दलची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

हे वाचलं का?

जिओच्या नेटवर्कबद्दल ग्राहक तक्रारी करत असून, ट्विटरवर #JIODown असा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. नेटवर्कसंदर्भात डाऊन डिटेक्टरच्या माहितीप्रमाणे जवळपास 4,000 हजार जिओच्या ग्राहकांना नेटवर्कची समस्या जाणवत आहे. तर हॅशटॅग जिओडाऊनवरही अशाच स्वरूपाच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत.

नेटकऱ्यांनी उडवताहेत टिंगल

ADVERTISEMENT

फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर जिओने एक ट्वीट केलं होतं. ते ट्वीट रिट्वीट करत नेटकरी खिल्ली उडवत आहेत. आता तुमचा नंबर, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

व्हॉट्सअॅप आणि फेसबुक डाऊन झाल्याचं बघून जिओनं असं केल्याचे मीम्स शेअर होतं आहेत.

नेटवर्कबद्दल तक्रारी केल्या जात असल्या, तरी नेटवर्कची समस्या कुठे आणि कशामुळे निर्माण झालीये, याबद्दल रिलायन्स जिओने कोणताही माहिती दिलेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT