PM Cares चा निधी वापरा, Central Vista चं काम थांबवा, शरद पवार-सोनियांसह प्रमुख विरोधी पक्षांचं मोदींना पत्र
देशात कोरोनाचा कहर हा दुसऱ्या लाटेत पाहण्यास मिळतो आहे. यामुळे आता देशातल्या बारा प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं पत्र लिहिलं आहे. सेंट्रल व्हिस्टाचं काम थांबवा, पीएम केअर्सचा निधी लसीकरण आणि आरोग्यसेवांसाठी वापरा हे आणि अशा प्रकारचे सल्लेही या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहेत. कोरोनाच्या महामारीत चेन्नई सुपर किंग्जचा मदतीचा […]
ADVERTISEMENT

देशात कोरोनाचा कहर हा दुसऱ्या लाटेत पाहण्यास मिळतो आहे. यामुळे आता देशातल्या बारा प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं पत्र लिहिलं आहे. सेंट्रल व्हिस्टाचं काम थांबवा, पीएम केअर्सचा निधी लसीकरण आणि आरोग्यसेवांसाठी वापरा हे आणि अशा प्रकारचे सल्लेही या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहेत.
कोरोनाच्या महामारीत चेन्नई सुपर किंग्जचा मदतीचा हात; 450 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर केले दान
विरोधकांनी नेमक्या काय काय मागण्या केल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे?
देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे, कोरोनाशी लढण्यासाठी लस हे महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे शक्य होईल तिथून लसी खरेदी करा देशातून असो वा विदेशातून लसी खरेदी करा आणि भारतीयांना द्या










