Rane: ‘ती सिंधुदुर्गाला लागलेली कीड’, वारिशे प्रकरणावरुन राणे कोणावर संतापले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Narayan Rane statement on journalist warishe death case: पुणे: पत्रकार शशिकांत वारिशे (Shashikant Warishe) यांच्या मृत्यू प्रकरणावर सध्या राज्यातील राजकारण बरंच तापलं आहे. या प्रकरणावरुन विरोधक हे सत्ताधारी भाजपवर (BJP) गंभीर आरोप करत आहेत. त्यातच शिवसेना (Shiv sena UBT) पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी याप्रकरणी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्याला आता नारायण राणेंनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. (journalist warishe death case narayan rane criticizes shiv sena mp vinayak raut)

ADVERTISEMENT

‘सिंधुदुर्गात कोणाचं काही होवो त्याला एकच नाव तोंडावर आहे. विनायक राऊत आमच्या सिंधुदुर्गाला लागलेली ती कीड आहे.’ अशी जोरदार टीका नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणी आपल्याला काहीही माहित नाही. पोलीस चौकशीत या घटनेचं नेमकं सत्य बाहेर येईल असं म्हणत नारायण राणेंनी या विषयावर फारसं भाष्य केलं नाही.

शशिकांत वारिशे: फडणवीसांचा मोठा निर्णय, राऊतांच्या पत्रानंतर पोलिसांना दिले आदेश

हे वाचलं का?

पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले:

‘वारिशे या पत्रकाराला मी कधीही भेटलो नाही. माझा संबंध नाही. बाकीचा घटनेशी माझा काही संबंध नाहीए. विनायक राऊताला सिंधुदुर्गात कोणाचं काही होवो त्याला एकच नाव तोंडावर आहे. आमच्या सिंधुदुर्गाला लागलेली ती कीड आहे. विकास कामाला व्यत्यय आणणं. आंदोलनं करणं, अडथळे निर्माण करणं. वारिशे आणि अशा प्रश्नाला उत्तर द्यायला मी आलेलो नाही. माझा वेळ सत्कारणी लागावा पुण्याच्या लोकांना. यासाठी मी इथे आलो आहे.’

‘आमचे देवेंद्र तर धमक्या देणारे नाहीच. अशा धमक्या कोणीही त्या भाषणात दिल्या नाहीत. हे जे घडलं आहे ते का घडलं हे पोलीस चौकशीत बाहेर येईल.’

ADVERTISEMENT

‘संजय राऊत, विनायक राऊत यांची काही मी दखल घेत नाही. ते काही महाराष्ट्राचे मोठे नेते वैगरे नाहीत. बदनाम आहे.. सामना चालत नाही म्हणून तो ब्रेकिंग न्यूज टाकल्या जाव्यात म्हणून तो प्रयत्न करतो.’

ADVERTISEMENT

‘कोकण किती मोठा आहे. सहा जिल्हे आहेत. एक महिन्यानंतर मी कोकणात गेलो होतो. बरं एक सांगतो.. कोणतीही हत्या झाली, अपघात झाला की पत्रकारांना तेवढाच प्रश्न येतो? पुण्यात विकासाचे, सामाजिक विधायक असे कोणतेच विषय नाहीत का?’

Pandharinath Amberkar : शशिकांत वारिशे मृत्यू, अटकेत असलेले आंबेरकर कोण?

‘जिकडे जावं तेच प्रश्न विचारतायेत. चौकशी होऊ दे.. कोणाचं नाव असेल कोण आरोपी असेल ते पाहून घेतली.’ असं म्हणत नारायण राणेंनी वारिशे प्रकरणावरील सर्वच प्रश्नांची उत्तर देणं जवळजवळ टाळलं.

मात्र, असं असलं तरीही दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारिशे प्रकरणात आता वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत SIT गठीत करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT