एकनाथ शिंदेंचा फोन, कैलास पाटलांनी उपोषण केलं स्थगित; आंदोलनस्थाळावरुन पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर
उस्माानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सातव्या दिवशी उपोषण तात्पूर्त स्थगित केलं आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदच उपोषणाला बसले होते. आज रविवारी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच […]
ADVERTISEMENT
उस्माानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सातव्या दिवशी उपोषण तात्पूर्त स्थगित केलं आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदच उपोषणाला बसले होते. आज रविवारी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
विरोधीपक्ष नेता अंबादास दानवेंनी घेतली कैलास पाटील यांची भेट
कैलास पाटील यांनी 2020 आणि 2021 सालचा पीकविमा मिळावा आणि अवेळी झालेल्या अतिवृष्ठीमुळे झालेल्या नुकसानी भरपाई मिळावी, यामागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले होते. सात दिवसात त्यांची प्रकृती देखील खालावली होती. स्वत: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कैलास पाटील यांच्याशी चर्चा केली. तसंच जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा केली. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आणि प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केले आहे. ज्यामध्ये अंबादास दानवे यांनी सकारात्मक मध्यस्थी केली.
उपोषण स्थगित केल्यानंतर कैलास पाटील थेट बांधावर
सातव्या दिवशी उपोषण स्थगित केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासाह आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट अतिवृष्ठीत नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. वैद्यकिय तपासणीच्या आदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेणं गरजेचं होतं, म्हणून मी येथे आलो, असं कैलास पाटील यांनी माध्यमांना सांगितलं. मी माझे उपोषण हे स्थगित केले आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात जर पैसे आले नाहीत तर माझाच लढा सुरुच राहील, असं कैलास पाटील म्हणाले.
हे वाचलं का?
या मागण्यासाठी होतं उपोषण
-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सन 2020 च्या पिक विम्याची 531 कोटी रक्कम जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी.
ADVERTISEMENT
-
ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रकमेत कोणतीही छुपी कपात करू नये.
ADVERTISEMENT
सन 2020-21 च्या पीक विम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी रुपये विमा पात्र सहा लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.
-
सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी डगफुटी रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 248 कोटी रुपये दोन लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे.
-
चालू खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी ढगफुटी पिकावरील रोगराईमुळे संपूर्ण पिके आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे, त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि पीडित शेतकऱ्यांना जीवघेण्या आर्थिक संकटातून दिलासा द्यावा. अशा काही मागण्या आमदार पाटील यांनी केल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT