कल्याण : Uber चालकाचं अपहरण करुन हत्या, मृतदेह कसारा घाटात फेकला
उबर चालकाचं अपहरण करुन त्याची हत्या केलेल्या तीन मारेकऱ्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. कारचालकाची हत्या करुन आरोपींनी त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकला. यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात लपून बसले होते. कल्याणचे DCP विवेक पानसरे यांनी एका पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. मारेकऱ्यांनी कल्याण ते धुळे प्रवासासाठी एक वाहन बुक […]
ADVERTISEMENT
उबर चालकाचं अपहरण करुन त्याची हत्या केलेल्या तीन मारेकऱ्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. कारचालकाची हत्या करुन आरोपींनी त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकला. यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात लपून बसले होते.
ADVERTISEMENT
कल्याणचे DCP विवेक पानसरे यांनी एका पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. मारेकऱ्यांनी कल्याण ते धुळे प्रवासासाठी एक वाहन बुक केलं. नाशिक महामार्गाजवळ कसारा परिसरात त्यांनी उबर गाडीचा चालक अमृत गावडे याची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी गावडे यांचा मृतदेह कसारा घाटात फेकला. वाहन मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.
हे वाचलं का?
मोबाईल लोकेशन आणि टोल नाक्यावरील वाहनाची एंट्री या आधारे पोलिसांनी तपास करत आरोपींचा शोध घेतला. आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेल्याचं समजताच पोलिसांनी पथकाची स्थापना करत राहुलकुमार गौतम, धर्मेंद्र कुमार, अमन गौतम या आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेतील इंडिका गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
Satara Double Murder : अनैतिक संबंधांमधून पत्नीसह प्रेयसीचाही काढला काटा, आरोपी पतीला अटक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT