Kapil Sibbal’s Dinner Party: गांधी परिवाराला वगळून विरोधकांची बैठक, Sharad Pawar यांचीही उपस्थिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष सतत एकत्र येऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यामध्ये एक अशी बैठक झाली की, ज्याकडे आता सर्वांचीच नजर गेली आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या वाढदिवसानिमित्त नवी दिल्ली येथे राजकीय मेजवानी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये विरोधी पक्षाचे अनेक मोठे चेहरे उपस्थित होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गांधी परिवाराच्या अनुपस्थितीत ही बैठक झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.

ही मेजवानी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) श्रीनगरच्या दौऱ्यावर असताना आणि प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) परदेशात असताना देण्यात आली. म्हणजेच या राजकी मेजवानीत गांधी परिवाराचा एकही सदस्य नव्हता. पण विरोधी पक्षातील अनेक बडे नेते सामील होते. कारण ही मेजवानी कपिल सिब्बल यांनी दिली होती, जे G-23 गटाचे देखील सदस्य आहेत. सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या राजकीय मेजवानीबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

हे वाचलं का?

यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या बैठकीला हजर होते. तसंच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील तिथे उपस्थित होते. याशिवाय लालू प्रसाद यादव, शरद यादव, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, डेरेक ओब्रायन यांच्यासह इतर अनेक नेते कपिल सिब्बल यांच्या या पार्टीत सामील होते. त्याच वेळी, जी -23 ग्रुपचे गुलाम नबी आझाद, भूपेंद्र हुड्डा, आनंद शर्मा, मनिष तिवारी, शशी थरूर, संदीप दीक्षित हे देखील हजर होते.

ADVERTISEMENT

कपिल सिब्बल यांच्या घरी झालेल्या मेजवानीत नेमकी काय चर्चा झाली?

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेजवानीत कपिल सिब्बल म्हणाले की, भाजपविरोधात मजबूत आघाडीची गरज आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ‘कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले मुद्दे पक्षाच्या आत किंवा बाहेर ते त्यांच्याशी सहमत आहेत आणि ते योग्य मुद्दे आहेत.’ कपिल सिब्बल त्यावर असं म्हणाले की, ‘ते पक्षाचे निष्ठावंत सैनिक आहेत, पक्षाच्या आत काय घडते हा पक्षाचा विषय आहे, परंतु पक्षाबाहेर विरोधकांनी एकजूट राहण्याची गरज आहे.’

आरजेडीचे लालूप्रसाद यादव यांनीही विरोधकांना एकसंध राहण्याची गरज असल्याचे मान्य केले. लालू म्हणाले की, ‘जे नेते येथे बसले आहेत त्यांच्याकडे ती ताकद आहे. कपिल सिब्बल यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, ते नेहमी गरजेच्या वेळी उपयोगी पडले आहेत. जेव्हा-जेव्हा कोणी संकटात सापडते तेव्हा त्याला कपिल सिब्बलांची आठवण येते.’ असंही ते म्हणाले.

सपा नेते अखिलेश यादव यांनीही विरोधकांनी कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या लोकांच्या अनुभवाचा चांगला वापर केला पाहिजे यावर भर दिला.

…इतर नेतेही सहभागी होते

दरम्यान, या मेजवानीत अकाली दलाकडून इंद्र कुमार गुजराल, बीजेडीकडून पिनाकी मिश्रा, आम आदमी पार्टीचे संजय सिंह आणि वायएसआर (काँग्रेस), टीआरएस आणि आरएलडीचे नेते उपस्थित होते.

शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत काय घडलं? सुधींद्र कुलकर्णी यांनी दिलं उत्तर

बीजेडीचे पिनाकी मिश्रा म्हणाले की, ‘त्यांना अनेकदा काही मुद्द्यांवर काँग्रेस पक्षासोबत यायचं असंत, पण याविषयी काँग्रेसमध्ये कोणाशी बोलावे हे त्यांना समजत नाही.’

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत विरोधी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, जर काँग्रेस पक्षाने आपले अंतर्गत प्रश्न सोडवले तर विरोधी पक्षाला चांगली संधी मिळू शकते. कारण हे दोन पक्ष सुमारे दोनशे जागांवर समोरासमोर आहेत. मात्र, विरोधकांच्या या संयुक्त बैठकीत कोणत्याही काँग्रेस नेत्याने आपल्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांवर भर दिला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT