हे सगळं गंभीर!; ‘करूणा शर्मा-धनंजय मुंडे’ प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. रविवारी परळीत झालेल्या प्रकारानंतर आता करुणा शर्मा यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं असून, दबावाविना चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विमानतळावर […]
ADVERTISEMENT

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. रविवारी परळीत झालेल्या प्रकारानंतर आता करुणा शर्मा यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं असून, दबावाविना चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात चर्चेत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मलाही आपल्या माध्यमातून ईडीने look out नोटीस काढली आहे, असं कळलं आहे. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने आणि कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं तेच योग्य होईल’, असा सल्ला फडणवीस यांनी देशमुखांना दिला.
यावेळी धनंजय मुंडे-करुणा शर्मा प्रकरणावरही फडणवीसांनी भूमिका मांडली. ‘यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बोलण्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचा कारण नाहीये.’









