Karuna Sharma यांचा कोठडीतला मुक्काम वाढला, जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

करूणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करूणा शर्मांवर आहे. त्यांना या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी म्हणजेच अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी म्हणजेच 14 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

रविवारी म्हणजेच 5 सप्टेंबरला परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा शर्मा आणि अरूण दत्तात्रय मोरे ( दोन्ही रा . मुंबई ) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते . सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती . मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने अरुण मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली .

सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत . बुधवारी दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.मात्र , दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यामुळे करुणा शर्मांना किमान मंगळवारपर्यंत कोठडीत राहावे लागणार हे निश्चित झाले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

करूणा शर्मा यांची ऑडिओ क्लिपही व्हायरल

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा रविवारी परळीमध्ये होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आलं. हे पिस्तुल बेकायदेशीररित्या बाळगल्याचं समोर आलं. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणात करुणा शर्मा यांच्यावर तक्रार दाखल झालेली असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे. करुणा शर्मा यांची परळीतील पत्रकार परिषद घेण्यापूर्वीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ADVERTISEMENT

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये करूणा शर्मा एका व्यक्तीशी बोलत आहेत. तो व्यक्ती पत्रकार परिषद घेण्यावरून करुणा शर्मा यांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले, तर न्यायालयाचा अवमान होईल, असं समोरचा व्यक्ती करुणा शर्मांशी बोलत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT