Kasba Peth : ब्राह्मण समाज कोणाला करणार मतदान? निर्णय झाला; कसब्यात बॅनर्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kasba Peth Assembly by poll :

ADVERTISEMENT

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्यानं ब्राह्मण समाजाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघात विविध ठिकाणी अनोखे बॅनर्स लागले आहेत. यात आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा. कसबा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा? आम्ही दाबणार नोटा, असं यात लिहिण्यात आलं आहे. (In the Kasba Peth by-election, there was talk of a person from Mukta Tilak’s family being nominated, but BJP has given ticket to Hemant Rasane.)

कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती, मात्र हेमंत रासने (Hemant Rasane) यांना दिली आहे. यावरूनच ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. रासने यांना तिकीट दिल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनीही याबद्दल ब्राम्हण समाजावर अन्याय झाल्याचं मत व्यक्त करत स्वतःची उमेदवारी जाहीर केली.

हे वाचलं का?

कसबा पेठ मतदारसंघात यापूर्वीही काही बॅनर्स झळकले होते. गतवेळी लावलेल्या बॅनर्सवर लिहिलेलं की, “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?” कसब्यात रात्रीच्या वेळी जवळपास २५ ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले होते. याशिवाय या बॅनरच्या खाली कसब्यातील एक जागरूक मतदार असंही लिहिलेलं होतं. आता पुन्हा असेच काहीसे बॅनर्स झळकले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 कसबा पेठेतून टिळकांना उमेदवारी का नाही?

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोतीबागेत असलेलं कार्यालय आणि त्यामुळे तिथे असलेलं RSS चं वर्चस्व. कसब्यातल्या राजकारणात पेठांचा मतदार दुर्लक्षित करुन चालत नाही. कसबा पेठ हा अनेक वर्षांपासून ब्राम्हण बहुल मतदारांचा मतदारसंघ. हाच भाजपचा पारंपारिक मतदारही राहिलाय. असं असलं तरीदेखील आता तिथली वस्ती म्हणजे मतदारांची डेमोग्राफी बदली आहे.

कसबा पेठेतील मतदारांची अंदाजे आकडेवारी :

  1. ब्राह्मण – ४० हजार

  2. मराठा – ४० हजार

  3. इतर मागासवर्गीय – १ लाख

  4. मुस्लिम – ३५ हजार

  5. जैन/मारवाडी – २० हजार

  6. दलित (मातंग) – २० हजार

  7. इतर – १५ हजार

हाच विचार करुन हेमंत रासने या ओबीसी समाजातल्या व्यक्तिला इथे उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT