Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ravindra Dhangekar Won in Kasba Peth By Election Results Latest News : अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी जोर लावलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेरकर जायंट किलर ठरले. तब्बल 1995 पासून भाजपकडे असलेला बालेकिल्ला काँग्रेसने महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा ताब्यात घेतला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. (Ravindra Dhangekar defeats hemant rasane)

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कसबा पेठ निवडणुकीत भाजपला धक्का बसला. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला.

कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल : रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपने टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना तिकीट दिलं होतं. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली होती. काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती.

हे वाचलं का?

Kasba Peth Bypoll Results 2023 : कसब्यात भाजपला झटका, धंगेकरांनी उधळला गुलाल!

रवींद्र धंगेकरांनी सुरूवातीलाच घेतली होती मुसंडी

कसबा पेठ पोटनिवडणूक निकालाची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. रवींद्र धंगेकर यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतली होती. पोस्टल मतांमध्ये रवींद्र धंगेकरांनी 1500 हजारांची आघाडी घेतली होती. महत्त्वाचं म्हणजे भाजपचं वर्चस्व असलेल्या पेठांमध्येही रवींद्र धंगेकर यांना आघाडी मिळाली आणि त्यामुळेच धंगेकरांनी मुसंडी घेतली.

ADVERTISEMENT

हेमंत रासनेंचा मोठा पराभव

कसबा पेठ मतदारसंघातून निवडणूक लढत असलेल्या हेमंत रासने यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव केला. धंगेकर यांना तब्बल 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली.

ADVERTISEMENT

Chinchwad Bypoll results 2023 Live Update: चिंचवडमध्ये भाजपला दिलासा, जगतापांना मोठी आघाडी

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांना 75 हजार 449 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना 47 हजार 296 मतं मिळाली होती. या निवडणुकीत मनसेचे अजय शिंदे यांना 8 हजार 284 मतं मिळाली होती. गेल्या निवडणुकीचा निकालातील मतांशी तुलना केल्यास भाजपची मतं घटली आहे.

Maharashtra Political Crisis live update : ठाकरेंना राजीनाम्याची चूक भोवणार?

1995 नंतर कसबा पेठ मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे

रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेसनं पुन्हा एकदा कसबा पेठ मतदारसंघावर कब्जा केला आहे. 1991 मध्ये काँग्रेसचे वसंत थोरात कसबा पेठ निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर 1995 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांनी विजय मिळवला. 1995 पासून 2014 पर्यंत भाजपचे गिरीश बापट हे पाच वेळा कसबा पेठ मतदासंघातून निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये मुक्ता टिळक यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्याही निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT