Ravindra Dhangekar : हेमंत रासनेंविरोधात काँग्रेसने जाहीर केला उमेदवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ravindra Dhangekar contest election in Kasba Peth bypoll by congress : कसबा पेठ (Kasba Peth) पोटनिवडणुकीत काँग्रेसनं (Congress) अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ मतदारसंघातून भाजपनं हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसनं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होताना दिसत आहे. भाजपनं महाविकास आघाडीला दोन्ही जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं, मात्र महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

भाजपनं चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली, तर कसबा पेठमधून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला न देता हेमंत रासने यांना दिली. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटला असून, काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला आहे.

हे वाचलं का?

Bypolls: मविआचा निर्णय झाला! राष्ट्रवादी आयात उमेदवाराला उतरवणार रिंगणात?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. नाना पटोले यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, “पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

रवींद्र धंगेकर पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार?

कसबा पेठ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच रवींद्र धंगेकर यांचं नाव काँग्रेसमध्ये चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर एक विधान केलं होतं. “गेल्या तीस वर्षांपासून राजकीय जीवनात असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मला उमेदवारी दिल्यास तेथूनच कसबा मतदारसंघात विजयाची नांदी सुरू होईल,” असं धंगेकर म्हणाले होते. आता काँग्रेसनं धंगेकरांना उमेदवारी दिली असून, ते पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार का? हे निकालानंतर दिसेल.

Balasaheb Thorat यांनी मौन सोडलं! तांबेंचं अभिनंदन करत म्हणाले, ‘जे झालं ते…’

रवींद्र धंगेकरांनी घेतली मुक्ता टिळक कुटुंबियांची भेट

रवींद्र धंगेकर हे भाजपच्या हेमंत रासने यांच्यासमोर तगड आव्हान असल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर धंगेकर यांनी केसरीवाड्यावर जाऊन दिवगंत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पती शैलेश टिळक, मुलगा रोहित टिळक, कुणाल टिळक यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT