Bypolls: मविआचा निर्णय झाला! राष्ट्रवादी आयात उमेदवाराला उतरवणार रिंगणात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maha Vikas Aghadi, By polls 2023 : चिंचवड, कसबा पेठ या दोन मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे रविवारी रात्री स्पष्ट झालं. महाविकास आघाडीने निर्णय जाहीर करताना मतदारसंघाबद्दल घोषणा केली. तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी उमेदवारांबद्दल सूचक विधान केलंय. दरम्यान, आज भाजप (Bjp), महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार अर्ज दाखल करणार असून, दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन बघायला मिळणार आहे. (Maha Vikas Aghadi will contest Kasba Peth, chinchwad by election 2023)

ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या आवाहनाकडे मविआकडून सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसलं. काल झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीची भूमिका जाहीर केली. कसबा पेठची जागा काँग्रेस लढवेल, तर चिंचवडची निवडणूक लढवेल, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केल्यानं दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होणार हे निश्चित झालं.

हे वाचलं का?

चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस माजी शिवसैनिकाला देणार तिकीट?

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिलीये. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण इच्छुक असले तरी पक्षाकडून माजी शिवसैनिकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळके यांनी याबद्दल सूचक विधान केलं आहे. त्यांनी माजी शिवसैनिक

KCR यांची दणक्यात एन्ट्री; ४ माजी आमदार अन् शेकडो कार्यकर्त्यांसह फोडला नारळ

ADVERTISEMENT

सुनील शेळके काय म्हणाले?

“चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेसचा उमेदवार हा घड्याळ असेल”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी उमेदवार आयात केला जाईल असाच सूचक इशारा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (5 जानेवारी) बैठक पार पडली. स्थानिक आयात उमेदवार दिला, तर प्रचार करणार नाही, असा सूर बैठकीत उमटला. शिवसेनेचे राहुल कलाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे दार ठोठावत असल्यानं हा रोष बैठकीत दिसून आला. दरम्यान यावर बोलताना शेळके म्हणाले, “राहुल कलाटे बाहेरचे नसून महाविकास आघाडीमधील आहेत आणि विजयी उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार,” असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे कलाटेंनाच संधी मिळू शकते.

ADVERTISEMENT

पुण्यात आज भाजप-महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन

पुण्यात आज (6 जानेवारी) भाजप आणि महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार. कसबा पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवाराचा अर्जही आजच दाखल करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यापूर्वी सकाळी 9 वाजता ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूने शक्तिप्रदर्शन करून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

Bypoll : प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना मेसेज, ‘मविआ’चं काय होणार?

भाजपकडून हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकात पाटील तसेच शहर भाजपतील नेते उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. भाजपची पदयात्रा सकाळी कसबा गणपतीचं दर्शन घेऊन पायी चालत श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत जाणार आहे. तर काँग्रेसचीही पदयात्रा कसबा गणपतीचं दर्शन घेऊन पायी चालत मंडई येथील टिळक पुतळ्यापर्यंत जाणार आहेत. शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी पुढे जाणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT