पवारांविरोधातील पोस्ट नडणार.. अभिनेत्री केतकीलाही सदावर्तेंसारखं महाराष्ट्र दर्शन घडणार?
मुंबई: गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीत घडलं, तसंच केतकी चितळेबद्दलही घडतं आहे. सदावर्तेंनी केलं तेच केतकीनंही केलं आणि दोघांमध्ये एक समान धागाही आहे. याच धाग्यामुळे सदावर्तेंसारखंच केतकीला पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन घडेल, असं दिसतं आहे. त्यामुळेच आपण सदावर्तेंच्या पावलावर पाऊल टाकत केतकीच्या केसची आगेकूच कशी सुरू आहे. तिच्याविरुद्ध कुठेकुठे गुन्हे दाखल झाले आहेत हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. […]
ADVERTISEMENT
मुंबई: गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीत घडलं, तसंच केतकी चितळेबद्दलही घडतं आहे. सदावर्तेंनी केलं तेच केतकीनंही केलं आणि दोघांमध्ये एक समान धागाही आहे. याच धाग्यामुळे सदावर्तेंसारखंच केतकीला पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन घडेल, असं दिसतं आहे. त्यामुळेच आपण सदावर्तेंच्या पावलावर पाऊल टाकत केतकीच्या केसची आगेकूच कशी सुरू आहे. तिच्याविरुद्ध कुठेकुठे गुन्हे दाखल झाले आहेत हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेला ठाण्यातील कळवा पोलिसांनी अटक केली. तुरुंगाची हवा खावी लागली. 18 मेपर्यंत कोर्टानं पोलिस कोठडी सुनावली आहे. यानंतर केतकीच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. रोज नवनव्या तक्रारी, गुन्हे तिच्या विरोधात दाखल होत आहेत. अगदी असचं वकील गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीतही घडलं.
पवारांच्या सिल्व्हर ओकसमोरील राडा प्रकरणात सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर एका प्रकरणात जामीन मिळताच सदावर्तेंना दुसऱ्या प्रकरणात अटक झाली. वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. एफआयआर कुंडलीमुळे सदावर्तेंना मुंबई, सातारा, कोल्हापूर असं महाराष्ट्र दर्शन घडलं. केतकी आणि सदावर्तेंमधला समान धागा हा शरद पवार आहेत.
हे वाचलं का?
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकीनं कोर्टात स्वतःच युक्तीवाद केला. वकील असलेल्या सदावर्तेंनीही मुंबईच्या कोर्टात एकदा स्वतःच युक्तीवाद केला होता. आता आपण केतकीविरोधात कुठे-कुठे गुन्हे दाखल झालेत, ते बघूया.
शरद पवारांविरुद्ध पोस्ट केल्यानंतर केतकीविरोधात दुसऱ्याच दिवशी 14 मेला ठाण्यातील कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन धार्मिक तेढ निर्माण करण्यासोबतच वेगवेगळ्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झाला.
ADVERTISEMENT
यानंतरच केतकीविरोधात एकापाठोपाठ एक धडाधड तक्रारी, गुन्हे दाखल झाले. मुंबईतील पवई, गोरेगाव, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, उस्मानाबाद याठिकाणी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. अहमदनगरमधील पारनेर पोलिसातही गुन्हा दाखल झाला. अशा एकूण 13 ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत.
ADVERTISEMENT
एका पोस्टमुळे अडचणीत आलेल्या केतकीची जुनी एफआयआर कुंडलीही ओपन होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी 1 मार्च 2020 ला केतकीनं एक पोस्ट केली होती. समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी करत तिने नवबौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात केतकीविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तिला अटकपूर्व जामीनही मिळाला नाही. अटकपूर्व जामीन फेटाळून आठ महिने झाले तरी पोलिसांनी या प्रकरणात अजून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ठाण्यातून जामीन मिळताच रबाळे पोलिस तिला अटक करण्याची शक्यता आहे.
केतकी चितळेची एक पोस्ट अन् वातावरण तापलं, कोण-कोण काय बोललं?
केतकीविरोधात जे गुन्हे दाखल झाले, ते दखलपात्र स्वरूपाचे आहेत. त्यामुळे जिथे-जिथे एफआयआर झाली आहे. तिथले पोलीस तिला ताब्यात घेऊ शकतात, अटक करू शकतात. एकदा एफआयआर दाखल झाली की ती पोलिसांना मागं घेता येत नाही. याचा सोक्षमोक्ष कोर्टातच लागतो. त्यामुळे सध्यातरी केतकीला गुणरत्न सदावर्तेंसारखंच एफआयआर कुंडलीमुळे महाराष्ट्र दर्शन घडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT