खामगावमध्ये वाघाचं दर्शन?; CCTV कैद झालेल्या दृश्यामुळे नागरिकांमध्ये दहशत
–जका खान बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सुटाळपुरा भागात काही नागरिकांना वाघाचं दर्शन घडल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांनी याची खात्री करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज बघितलं. त्यात वाघासारखा प्राणी जाताना दिसला. वनविभागानं पावलांच्या ठशांवरून वाघ असू शकतो, असा अंदाज व्यक्त केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. खामगाव शहराच्या सुटाळपुरा भागातील गाडगे महाराज गल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला वाघासारखा प्राणी […]
ADVERTISEMENT
–जका खान
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सुटाळपुरा भागात काही नागरिकांना वाघाचं दर्शन घडल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांनी याची खात्री करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज बघितलं. त्यात वाघासारखा प्राणी जाताना दिसला. वनविभागानं पावलांच्या ठशांवरून वाघ असू शकतो, असा अंदाज व्यक्त केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
खामगाव शहराच्या सुटाळपुरा भागातील गाडगे महाराज गल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला वाघासारखा प्राणी दिसला. शनिवारी (4 डिसेंबर) पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाघाप्रमाणेच हा वन्यप्राणी गुरगुरल्यामुळे महिला घाबरून गेली. याबाबत तिने कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. नंतर थोड्याच वेळाने ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण परिसरात पसरली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
यावर काही जणांनी शंका उपस्थित केली. वाघ वस्तीत कसा येऊ शकतो? अशा शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत होत्या. त्यामुळे सकाळी 8 वाजताच्या सुमारास नागरिकांनी के.आर. राजपूत यांच्या दारासमोर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज पडताळून बघितलं.
या फुटेजची पाहणी केली असता, वाघासारखा दिसणारा वन्यप्राणी राजपूत यांच्या गेट समोरून जात असल्याचे cctv कॅमेऱ्यात दिसून आलं. सोशल मीडियावर cctv फुटेज वायरल झाला असून, नागरिक दहशतीखाली आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे किशोर पडोळे घटनास्थळी पोहचले. त्याचबरोबर बुलडाणा येथून आलेल्या ठसे तज्ञांनी वन्यप्राण्याच्या पायाच्या ठशांची पाहणी केली. त्यानंतर हा वन्यप्राणी वाघ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ADVERTISEMENT