मांजरीच्या धक्क्याने सांडलेलं विषारी औषध दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या पोटात, बाळाचा दुर्दैवी मृत्यू
घरात शिरलेल्या मांजराने कपाटावर ठेवलेला डब्बा खाली पाडला. या डब्याच्या शेजारी ठेवलेलं किटकनाशक जमिनीवर पडलं, याचदरम्यान घरात जमिनीवर खेळत असलेल्या दीड वर्षाच्या मुलाच्या तोंडात नकळत हे औषध गेल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूरच्या कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलका कॉलनीत हा प्रकार घडला आहे. रियांश उर्फ मुन्ना अजय पाटील असं या दुर्दैवी बालकाचं […]
ADVERTISEMENT
घरात शिरलेल्या मांजराने कपाटावर ठेवलेला डब्बा खाली पाडला. या डब्याच्या शेजारी ठेवलेलं किटकनाशक जमिनीवर पडलं, याचदरम्यान घरात जमिनीवर खेळत असलेल्या दीड वर्षाच्या मुलाच्या तोंडात नकळत हे औषध गेल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूरच्या कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलका कॉलनीत हा प्रकार घडला आहे. रियांश उर्फ मुन्ना अजय पाटील असं या दुर्दैवी बालकाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालकाचे वडील अजय पाटील हे मलका कॉलनी परिसरात राहतात. अजय पाटील यांची शेती आहे, काही दिवसांपूर्वी पाटलांनी पिकावर फवारणी करण्यासाठी लागणारी किटकनाशकाची एक बाटली घरात आणली होती. लहानग्या मुलाच्या हाती ती बाटली लागू नये म्हणून अजय पाटलांनी ती कपाटावर ठेवली.
सोमवारी दुपारी अजय पाटील कामानिमीत्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी अजय पाटील यांची पत्नी घरकामात व्यस्त होती. याचवेळी घरात शिरलेल्या एका मांजराने कपाटावरचा एक डब्बा खाली पाडला. या डब्याच्या धक्क्यामुळे कीटकनाशकाची बाटलीही जमिनीवर सांडली. यावेळी जमिनीवरच खेळणारा रियांश या ठिकाणी आला आणि नकळत त्याचा स्पर्श या कीटकनाशकाला झाला. रियांशचं संपूर्ण शरीर या किटकनाशकाने माखलं होतं. यादरम्यान नकळत रियांशचे हात तोंडात गेले, ही बाब दुर्दैवाने घरातल्या कोणाच्याही लक्षात आली नाही.
हे वाचलं का?
रियांशच्या आईने आपल्या मुलाला माखलेलं पाहिल्यानंतर त्याला उचलून स्वच्छ आंघोळही घातली. परंतू यावेळी आपल्या मुलाच्या पोटात विषारी द्रव्य गेल्याची कल्पनाही तिला आली नाही. परंतू काही वेळाने रियांशची तब्येत बिघडल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू तिकडेही रियांशची तब्येत खालावत गेली, ज्यानंतर त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT