प्रभाकरला नवाब मलिकांनी एक फ्लॅट आणि पैसे दिले, किरण गोसावीचा आरोप
आर्यन खान प्रकरणाची चर्चा 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच त्याला एनसीबीने अटक केल्यापासून रंगते आहे. अशात या प्रकरणी आणखी एका व्यक्तीची चर्चा चांगलीच रंगली ती म्हणजे आर्यन खानसोबत सेल्फी काढणारा के. पी. गोसावी. किरण गोसावी हा त्या दिवसापासून गायब होता. मात्र त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर याने रविवारी मीडियासमोर येऊन काही आरोप केले. त्यानंतर किरण गोसावीही ट्रॅक झाला. त्याने […]
ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणाची चर्चा 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच त्याला एनसीबीने अटक केल्यापासून रंगते आहे. अशात या प्रकरणी आणखी एका व्यक्तीची चर्चा चांगलीच रंगली ती म्हणजे आर्यन खानसोबत सेल्फी काढणारा के. पी. गोसावी. किरण गोसावी हा त्या दिवसापासून गायब होता. मात्र त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर याने रविवारी मीडियासमोर येऊन काही आरोप केले. त्यानंतर किरण गोसावीही ट्रॅक झाला. त्याने इंडिया टुडेसोबत संवाद साधत आपल्या जिवाला धोका असल्याने गायब असल्याचं सांगितलं.
एवढंच नाही तर आपण सरेंडर करणार आहोत. लखनऊ या ठिकाणी सरेंडर करणार आहोत कारण महाराष्ट्रात जिवाला धोका वाटतो आहे असंही किरण गोसावीने सांगितलं. आता आज सरेंडरसाठी जात असतानाही त्याने इंडिया टुडेसोबत संवाद साधला आहे.
काय म्हणाला किरण गोसावी?
सहा तारखेपर्यंत मी मुंबईत होतो. त्यानंतर मला मोठ्या प्रमाणावर धमक्यांचे फोन येऊ लागले. मला ठार करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे मी नाईलाजाने फोन बंद केला. 6 ऑक्टोबरला ही केस पूर्णपणे ओपन झाली त्यावेळी मला हे समजलं की माझ्याविरोधात जी फसवणुकीची केस आहे ती पण ओपन झाली आहे. त्यासंदर्भात जेव्हा मी पुण्याला जात होतो त्यावेळीही मला फोन आला. फोनवर हे सांगण्यात आलं की तुला अरेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुला कुणीही वाचवणार नाही. तुला कुणीही सोडणार नाही. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पुण्यात जाऊन सरेंडर करण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर माझा जीव वाचावा म्हणून मी राज्याबाहेर गेलो. जे काही मी लिहून दिलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी कोर्टात बोलेन.
